Home /News /astrology /

शुक्राच्या राशी परिवर्तनाने 4 राशींचं वाढणार Tension; खर्चावर ठेवा नियंत्रण

शुक्राच्या राशी परिवर्तनाने 4 राशींचं वाढणार Tension; खर्चावर ठेवा नियंत्रण

शुक्राचं राशी परिवर्तन ज्योतिष शास्त्रानुसार (According to Astrology) काही राशींसाठी नुकसानदायक ठरणार आहे.

    नवी दिल्ली, 12 ऑगस्ट : ज्योतिष शास्त्रानुसार (According to Astrology) ग्रहांचे स्थान बदलण्याचा राशींवर  (Zodiac Sing)  परिणाम होत असतो. ऑगस्ट (August) महिन्यामध्ये काही ग्रह आपलं स्थान बदलणार आहेत. हे ग्रह दुसऱ्या राशींमध्ये स्थानापन्न झाल्यामुळे सगळ्याच राशींवर परिणाम (Effect) होणार आहे. यातील शुक्राने राशी परिवर्तन केल्यामुळे त्याचा 12 राशींवर परिणाम होणार आहे. शुक्राने कन्या राशीमध्ये प्रवेश केलेला आहे. त्याचा परिणाम आजपासून दिसायला लागेल. कन्या राशीतला शुक्राचा प्रवेश काही राशींसाठी भाग्यदायक तर काही राशींसाठी नुकसानदायक ठरणार आहे. शुक्राच्या राशी परिवर्तनामुळे 4 राशीच्या व्यक्तींना आर्थिक संकटांना सामोरं जावं लागणार आहे. खर्च वाढून पैसा येण्याच्या मार्गात अडचणीत निर्माण होणार आहेत. त्यामुळेच नवीन गुंतवणूक करतानाही सतर्क राहावं लागणार आहे. पाहूयात कोणत्या राशीसाठी शुक्राचं राशी परिवर्तन नुकसानदायक ठरणार आहे. (रक्षाबंधनला बहिणीला करा खूश! बघा भेट देण्यासाठी बरेच आहेत पर्याय) मेष रास मेष राशीच्या लोकांचं शुक्राच्या राशी परिवर्तनामुळे नुकसान होणार आहे. खर्चामध्ये वाढ होऊन मानसिक तणाव वाढणार आहेत. या काळामध्ये जवळच्या व्यक्तीकडून फसवणूक होण्याची शक्यता आहे. या काळात गुंतवणूक करू नये, नाहीतर नुकसान भोगावं लागेल. वाहन चालवताना सावधानता बाळगावी. आजारपणावर खर्च होण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी भांडण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे वाद-विवादायापासून दूर राहावं. (तुम्हालाही वाटतो भाजी चिरणं हा Task? ही पद्धत वापरून वाचवा वेळ, वाढेल पोषण) मिथुन रास मिथुन राशीच्या लोकांना करिअरमध्ये चढ-उतार पहावे लागणार आहेत. भागीदारी मधील व्यवसायामध्ये नुकसान होईल. नोकरीच्या शोधात असणाऱ्या लोकांना नवीन संधी प्राप्त होणार नाहीत. त्यामुळे धीर धरावा लागेल. आई-वडिलांबरोबर वाद होण्याची शक्यता आहे. या काळात शत्रू वाढणार आहेत. (पुष्कराजला स्वस्त आणि उत्तम पर्याय सुनेहला स्टोन; उघडतील यशाचे दरवाजे) कर्क रास कर्क राशीच्या लोकांचं आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पैसे जपून खर्च करावेत. कर्जबाजारी होण्याची वेळ येईल. उद्योगधंद्यांमध्ये आर्थिक अडचणींचा सामना करावा लागेल. आरोग्याकडे विशेष लक्ष द्यावं. आहार चांगला घ्यावा. मित्रांबरोबर संबंध बिघडणार नाहीत याकडे लक्ष द्यावं. (3 राशीचे लोक असतात अतिशय बुद्धिमान; कधीच पहावं लागत नाही अपयशाचं तोंड) धनु राशी धनु राशीच्या लोकांसाठी शुक्राच्या राशी परिवर्तनाने अडचणी वाढणार आहेत. घरात चोरी होण्याची शक्यता आहे. कार्यक्षेत्रामध्ये वाद टाळावेत. अन्यथा नुकसान होण्याची शक्यता आहे. आळस वाढल्यामुळे हाती घेतलेली कामं अपूर्ण राहतील. बॉसबरोबर संबंध बिघडण्याची शक्यता आहे. शक्यतो आपल्या तोंडावर ताबा ठेवण्याचा प्रयत्न करावा. (Disclaimer: या लेखामधली तपशील आणि सूचना सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. news18lokmat.com त्याची पुष्टी करत नाही. याला शास्त्रीय आधार नाही.)
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Astrology and horoscope, Lifestyle, Rashibhavishya, Rashichark

    पुढील बातम्या