दिल्ली, 28 जुलै : ज्योतिष शास्त्रानुसार (According to Astrology) ग्रहांचे स्थान बदलण्याचा राशींवर (Zodiac Sing) परिणाम होत असतो. ऑगस्ट (August) महिन्यामध्ये काही ग्रह आपलं स्थान बदलणार आहेत. हे ग्रह दुसऱ्या राशींमध्ये स्थानापन्न झाल्यामुळे सगळ्याच राशींवर परिणाम (Effect) होणार आहे. 9 ऑगस्टला बुद्ध ग्रह सिंह राशीमध्ये आणि 11 ऑगस्टला शुक्र ग्रह कन्या राशीमध्ये प्रवेश करेल. याशिवाय सूर्य 17 ऑगस्टला सिंह राशीमध्ये प्रवेश करेल. 17 ऑगस्टला सूर्याने सिंह राशीत प्रवेश केल्यानंतर आधीच या राशींमध्ये असलेल्या बुद्ध ग्रहामुळे ‘बुधादित्य’ योग निर्माण होणार आहे. या राशी मध्ये बुध आणि सूर्याची युती झाल्यामुळे शुभयोग होणार आहेत. त्यामुळे काही राशींना ऑगस्ट महिन्यामध्ये फायदा (Benefits) होणार आहे.
मेष रास
मेष राशीच्या जातकांसाठी करियर आणि उद्योगासाठी हा महिना शुभ लाभ देणारा आहे. कार्यक्षेत्रामध्ये यश मिळेल. मेहनतीचं फळ पदरात पडेल. व्यवसायामध्ये आर्थिक फायदे होतील. सुरुवाती पेक्षा महिन्याचा मध्य लाभदायक ठरेल.
(कॅफिनचं Tension सोडा! रोज सकाळी घ्या कॉफी; डायबिटीस,ब्लडप्रेशर राहील नियंत्रणात)
वृषभ रास
ऑगस्ट महिन्यामध्ये ग्रहांची बदलती स्थिती वृषभसाठी फायदेशीर ठरेल. मानसन्मान वाढेल. प्रगतीच्या संधी प्राप्त होतील. मित्र आणि सहकाऱ्यांबरोबर चांगले संबंध निर्माण होतील. पैसा येण्याचे मार्ग उपलब्ध होतील.
मिथुन रास
मिथुन राशीच्या लोकांसाठी ऑगस्ट महिना लाभदायक आहे. सरकारी नोकरी करणाऱ्या लोकांना मानसन्मान मिळणार आहे. प्रगती होणार आहे. व्यापारामध्ये फायदा होईल. इन्व्हेस्टमेंटसाठी हा महिना उत्तम आहे.
(Pecan Nuts आहेत न्युट्रिशनचं पॉवर हाऊस; झटपट एनर्जीसाठी रोज खा)
सिंह रास
सिंह राशीच्या लोकांना प्रत्येक कार्य क्षेत्रामध्ये यश मिळणार आहे. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना या वेळी चांगली संधी मिळेल. व्यापारात फायदा होईल आत्मविश्वास वाढेल.
(‘या’ राशींवर असतो शुक्राचा प्रभाव; मिळतं यश आणि सुख-समृद्धी)
तुळ रास
तूळ राशीसाठी ऑगस्ट महिना शुभ आणि चांगले परिणाम देणारा असणार आहे. या महिन्यांमध्ये इमानदारीने काम केल्याचं फळ मिळेल. नोकरी करणाऱ्या लोकांना नवीन संधी मिळतील. कार्यक्षेत्रामध्ये दबदबा वाढेल. नवीन जबाबदाऱ्या अंगावर पडतील. वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबर संबंध चांगले होतील. एखाद्या नवीन कामाची सुरुवात करण्यासाठी हा महिना शुभ आहे.
(Disclaimer: या लेखामधली तपशील आणि सूचना सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. news18lokmat.com त्याची पुष्टी करत नाही. याला शास्त्रीय आधार नाही.)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.