नवी दिल्ली, 05 ऑगस्ट : ज्योतिष शास्त्रानुसार (According to Astrology) आपल्या आयुष्यावर ग्रहांचा जास्त प्रभाव असतो. हे ग्रह कधी शुभ तर, कधी अशुभ फळ (Positive or Negative Effect) देत असतात. शुक्र ग्रह प्रगतीचा कारक मानला जातो. तरीदेखील काही राशींवर (Zodiac Sing) याचा प्रभाव अशुभ ठरू शकतो. शुक्र ग्रहाच्या शुभ प्रवाहामुळे वैवाहिक जीवनात (Married Life) सुख प्राप्त होतं. मात्र, ज्या राशींसाठी शुक्र ग्रह अशुभ ठरतो त्यांना या सगळ्या सुखापासून वंचित राहावं लागतं. ज्योतिष शास्त्रानुसार शुक्र ग्रहाचा चांगला प्रभाव मिळवण्यासाठी काही उपाय (Remedy) करता येऊ शकतात.
ज्योतिष शास्त्रानुसार मेष, कर्क, सिंह, वृश्चिक, धनु आणि मीन राशीसाठी शुक्र ग्रह अशुभ प्रभाव देणारा असतो. ज्या राशींमध्ये शुक्र ग्रहाचा जन्म पत्रिकेमध्ये अशुभ प्रभाव असेल त्यांच्या वैवाहिक जीवनावर परिणाम होऊन अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे या राशीच्या लोकांनी शुक्राचा प्रभाव मिळविण्यासाठी काही उपाय करायला हवेत.
(घरात झाला उंदरांचा सुळसुळाट; ‘या’ 5 उपायांनी करा बंदोबस्त)
रत्न धारण करा
शुक्राचा अशुभ प्रभाव कमी करण्यासाठी काही रत्न धारण करणारण्याने फायदा मिळतो. सफेद रंगाचा पुष्कराज किंवा सफेद ओपल चांदीच्या अंगठीमध्ये उजव्या हाताच्या करंगळीजवळच्या बोटात धारण करण्याने फायदा होतो. याशिवाय हिरा प्लॅटिनममध्ये धारण करणंही फायदेशीर
ठरतं. मात्र हा उपाय शुक्रवारी सुर्योदयानंतरच करावा. प्लॅटिनम धारण करणं शक्य नसेल तर, चांदीमध्ये देखील हिरा धारण करता येतो. हिऱ्याची अंगठी धारण करताना ‘ओम शुक्राय नमः’ हा मंत्र जपावा.
(Trick नाही; विश्वास बसत नसला तरी खरंच अशी आहेत ही माणसं! एक आहे महाराष्ट्रातली)
रत्न विकत करणं घेणे शक्य नसेल तर अशा लोकांनी मंजिष्ठाच्या मुळ्या सफेद कापडामध्ये बांधून शुक्रवारी उजव्या हाताच्या दंडावर बांधाव्यात. या उपायामुळे शुक्राचा वाईट प्रभाव कमी होऊन घरामध्ये सुख-समृद्धी नांदेल.
(त्वचा विकारांवर रामबाण औषध आहे ‘हे’ तेल; लगेच करा वापरायला सुरुवात)
शुक्राचा अशुभ प्रभाव कमी करण्यासाठी तेलाचाही वापर करता येतो. अर्धा लिटर नारळाचं तेल, अर्धा लिटर सफेद तिळाचे तेल, 5 ग्रॅम चंदन तेल आणि दोन ग्रॅम चमेली तेल, एका काचेच्या बाटलीमध्ये भरून उन्हामध्ये ठेवा. आंघोळीनंतर शरीराला लावल्यामुळे शुक्राची अनिष्ट दृष्टी कमी होऊन शरीरावर चमक वाढेल.
(Shocking! रात्री अज्ञातासोबत तरुणीने केलं असं काही, काही क्षणातच पुतळा बनली)
याशिवाय जेवताना आपल्या ताटामधला घास बाजूला ठेवा आणि रोज हा घास सफेद गाईला खायला घाला. सफेद वासराचं दान करा. शक्य असल्यास घरात सफेद गाय पाळू शकता. शुक्रवारी लक्ष्मीचं पूजन करा. शुक्रवारी सफेद वस्त्र घाला. शुक्रवारी देवीला मखाणे किंवा तांदळाची खीरीचा प्रसाद दाखवा. सफेद चंदनाचा टिळा लावा.
(Disclaimer: या लेखामधली तपशील आणि सूचना सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. news18lokmat.com त्याची पुष्टी करत नाही. याला शास्त्रीय आधार नाही.)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.