Home /News /astrology /

Daily Horoscope : 'या' राशींवर होणार भावनिक आघात; जवळची व्यक्ती दूर जाईल किंवा एखादी गोष्ट गमवाल

Daily Horoscope : 'या' राशींवर होणार भावनिक आघात; जवळची व्यक्ती दूर जाईल किंवा एखादी गोष्ट गमवाल

Horoscope 29 May 2022 : सूर्यराशीनुसार 29 मे 2022 दिवसाचं तुमचं राशिभविष्य.

सितारा - द वेलनेस स्टुडिओच्या संस्थापिका पूजा चंद्रा (Pooja Chandra, Founder, Citaaraa - The Wellness Studio www.citaaraa.co) प्रसिद्ध जोतिषतज्ज्ञ असून, त्यांनी आपल्या ओरॅकल स्पीक्स या सदराच्या माध्यमातून प्रत्येक राशीचं 29 मे 2022 या दिवसासाठीचं भविष्य सांगितलं आहे. मेष (Aries) (मार्च 21 ते एप्रिल 19) आव्हानात्मक परिस्थिती वारंवार येत असली, तर पुन्हा दमदार पुनरागमन करण्यासाठी स्वतःला सज्ज ठेवा. कामाच्या ठिकाणी मिळालेली संधी प्रतिमानिर्मितीला मदत करील. दीर्घ काळापासून तुम्ही प्रतीक्षेत असलेलं अर्थसाह्य मिळेल. सध्याच्या स्थितीत ते वरदान ठरेल. तुमच्या आई-वडिलांनी एखाद्या करण्यासारख्या गोष्टीची इच्छा व्यक्त केली, तर त्यावर प्रश्न विचारण्याची गरज नाही. LUCKY SIGN - A silk cloth वृषभ (Taurus) (एप्रिल 20 ते मे 20) एखाद्या नव्या व्यक्तीबद्दल तुमच्या मनात कुतुहल निर्माण होईल. थोडासा संवाद किंवा फॉलो-अपची शक्यता आहे. जे तुम्ही स्वतःच निवडलं असेल, ते तुम्ही करत नसल्याची भावना तुमच्या मनात निर्माण होण्याची शक्यता आहे. जुन्या छंदांत पुन्हा रममाण होण्यास किंवा सध्याच्या सवयींना नवं रूप देण्यास तुम्ही सुरुवात करू शकता. दुसऱ्या कोणाचं तरी आयुष्य तुमच्यासाठी प्रेरणादायी ठरू शकतं. LUCKY SIGN - A string light मिथुन (Gemini) (21 मे ते 21 जून) तुमच्या आवडीच्या क्षेत्रात एखादी नवी आणि प्रेरक गोष्ट कळेल. तुम्ही पार्टनरशिपसाठी कोणाच्या संपर्कात असलात, तर ते करू नये असा सल्ला दिला जात आहे. तुम्हाला मिळालेले लाभ आणि रिसोर्सेस यांची तुम्ही दखल घेतली पाहिजे आणि कौतुकही केलं पाहिजे. कारण तसं प्रत्येकाला मिळत नाही. कामासाठी प्रवासाचे योग आहेत. तो प्रवास यशस्वी होण्याचीही शक्यता आहे. सतत काही तरी मागणी करणाऱ्या व्यक्तीमुळे तुमची काही ऊर्जा खर्च होऊ शकते. LUCKY SIGN - A new car कर्क (Cancer) (22 जून ते 22 जुलै) तुमच्या जवळची एखादी व्यक्ती तुमची गुपितं गुप्त राखणार नाही. तुमच्या कल्पना आणि मतं यांबद्दल कोणावर विश्वास ठेवण्याआधी तुम्ही दोनदा विचार करायला हवा. तुम्ही राजकीय क्षेत्रात किंवा सरकारी नोकरीत असलात, तर काही तरी मोठा बदल घडण्याची शक्यता आहे. तुमच्या वैयक्तिक कामगिरीबद्दल काही प्रकारची चौकशी लवकरच होण्याची शक्यता आहे. पैशांचा प्रवाह वाढण्याची शक्यता आहे. एकांत मिळणं फार कठीण आहे. LUCKY SIGN - A hen सिंह (Leo) (23 जुलै ते 22 ऑगस्ट) संतुलित ऊर्जेसह दिवस सुंदर आहे. स्वतःचं कोडकौतुक, लाड करण्यासाठी तुम्हाला वेळ मिळू शकेल. तुम्हाला आवडणाऱ्या व्यक्तींशी दीर्घ चर्चा होतील. संताप, राग काही काळ बाजूला ठेवलेलाच बरा. क्लृप्तीमुळे फरक पडेल. अन्य व्यक्ती तुमच्याबरोबरचे नातेसंबंध सुधारण्याचा प्रयत्न करत असल्याची जाणीव तुम्हाला होईल. कामाच्या ठिकाणच्या वरिष्ठ व्यक्तीला अचानक निघून जावं लागण्याची शक्यता आहे. LUCKY SIGN - A squirrel कन्या (Virgo) (23 ऑगस्ट ते 22 सप्टेंबर) जुन्या मित्रांवर विश्वास ठेवायला हवा. कारण ते तुमच्यात सकारात्मक बदल घडवून आणू शकतात.  दिवस तुलनेने संथ असेल; मात्र एकदम निवांत नसेल. मागचं शिल्लक राहिलेलं बरंच काम तुमचा वेळ घेईल. संध्याकाळचा वेळ अधिक मनोरंजक असेल. येत्या आठवड्यात कामाच्या ठिकाणी सध्याचा पॅटर्न मोडण्याची नितांत गरज आहे. कष्ट आणि चिकाटीची गरज आहे. LUCKY SIGN - A copper wire तूळ (Libra) (23 सप्टेंबर ते 23 ऑक्टोबर) सध्याच्या दिवसांत तुम्ही बरेच सेल्फ-मोटिव्हेटेड असल्याचं दिसतं आहे. तुमच्या चुकीचं खापर दुसऱ्या कोणाच्या डोक्यावर फोडणं अयोग्य आहे. तुमच्या जुन्या अनुभवांच्या आधारे विश्वासार्हतेचा मुद्दा उभा राहू शकतो. तुम्हाला पुनर्विचार करण्याची गरज भासू शकते. कामाच्या ठिकाणाहून आलेली चांगली बातमी तुमचा एकंदर मूड उत्तम करील. एखाद्याला तुमच्या मदतीची गरज असल्यास ती व्यक्ती तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करील. LUCKY SIGN - A yellow rose वृश्चिक (Scorpio) (24 ऑक्टोबर ते 21 नोव्हेंबर) खूपच टीकात्मक विश्लेषण केल्यास आगामी एखाद्या गोष्टीचा बट्ट्याबोळ होऊ शकतो. अगदी छोट्याशा मुद्द्यावरून वाद घालण्याची गरज नाही. निसर्गाच्या सान्निध्यात राहून किंवा ध्यानधारणेतून तुम्हाला हवी असलेली शांतता मिळेल. कामाच्या ठिकाणी काही नवीन गोष्टी समोर येत असल्यास तुम्ही बॅकअप प्लॅन्स तयार करायला सुरुवात करा. एखाद्या प्रभावी व्यक्तीशी तुमची ओळख होईल. LUCKY SIGN - A toad धनू (Sagittarius) (22 नोव्हेंबर ते 21 डिसेंबर) बऱ्याच काळापासून भेट न झालेली व्यक्ती आता तुमच्याशी संपर्कात राहण्याची शक्यता आहे. सध्या तुम्हाला मित्रांमुळे मोठा दिलासा मिळत आहे. तुम्ही जे काही शोधून काढलं आहे, त्यात थोडंसंच सत्य असण्याची शक्यता आहे. तुम्ही एखादी मौल्यवान वस्तू गमावली असले, तर लवकरच ती तुम्हाला परत मिळण्याची शक्यता आहे. तुम्हाला कामावर ठेवून घेऊ इच्छिणारी एखादी व्यक्ती तुमच्यापर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. LUCKY SIGN - A money plant मकर (Capricorn) (22 डिसेंबर ते 19 जानेवारी) गेल्या काही दिवसांत सतत प्रवास सुरू आहे. आणखी काही दिवस तो तसाच सुरू राहणार आहे. त्यातून तुम्हाला काही नव्या कल्पना आणि विचार सुचतील. एखादी आकर्षक, इंटरेस्टिंग विरुद्धलिंगी व्यक्ती तुमचं लक्ष वेधून घेईल. भविष्यकाळात काय करायचं आहे याच्या नियोजनासाठी तुम्ही काही वेळ राखून ठेवला पाहिजे. सध्या सुरू असलेल्या अनेक गोष्टींमुळे तुमचं लक्ष विचलित होता कामा नये. तुमची उद्दिष्टं मोजता येण्यासारखी ठेवा. LUCKY SIGN - A feather कुंभ (Aquarius) (20 जानेवारी ते 18 फेब्रुवारी) शक्यता आणि आशा या गोष्टींमुळे तुम्ही पुढे वाटचाल करत आहात. वेळ वाया घालवू नका. तुम्ही जे काही हाती घेतलं आहे, त्यात सातत्य ठेवा. घरगुती मुद्दे संयमाने सोडवण्याची गरज आहे. तुम्ही भूतकाळात घेतलेल्या एखाद्या कर्जाकडे आता लक्ष देण्याची गरज आहे. तुम्हाला लवकरच मित्रांचं गेट-टुगेदर आयोजित करावं लागणार आहे. तुमच्या जवळची एखादी व्यक्ती अचानक दूर जाण्याचा निर्णय घेऊ शकेल. LUCKY SIGN - A yellow quartz मीन (Pisces) (19 फेब्रुवारी ते 20 मार्च) दैनंदिन कामं आता एका बाजूला ठेवावी लागतील. कारण अन्य गोष्टींकडे लक्ष द्यावं लागेल. आईच्या आरोग्यासाठी योग्य थेरपीची किंवा योग्य मार्गदर्शनाची गरज आहे. अवतीभवती आध्यात्मिक वातावरणाची अनुभूती घ्याल. कामाच्या ठिकाणी कोणी तरी विचित्र वागण्याची शक्यता आहे; मात्र तुम्ही त्यावर मात करू शकाल. लवकरच परदेशातून काही पाहुणे येण्याची शक्यता आहे. तुमच्याजवळची एखादी गोष्ट गमावली जाण्याची शक्यता आहे. LUCKY SIGN - A wooden box
First published:

Tags: Astrology and horoscope, Lifestyle, Rashibhavishya, Zodiac signs

पुढील बातम्या