Home /News /astrology /

दैनंदिन राशिभविष्य : 'या' राशींना होणार आर्थिक लाभ; पाहा ती रास तुमची आहे का?

दैनंदिन राशिभविष्य : 'या' राशींना होणार आर्थिक लाभ; पाहा ती रास तुमची आहे का?

Daily Horoscope 29 June 2022 : आज आर्थिक शुभ वार्ता मिळेल पण काहींना आर्थिक खर्चही करावा लागेल.

आज दिनांक 29 जून 2022. बुधवार. आज ज्येष्ठ अमावस्या सकाळी आठ वाजून तेवीस मिनिटांपर्यंत. आज चंद्राचे भ्रमण आर्द्रा नक्षत्रात होणार आहे. पाहूया आजचे बारा राशींचे भविष्य. मेष आज चंद्र तृतीय स्थानात असून मानसिक ताण येईल. राशीतील मंगळ राहू प्रकृतीची काळजी घ्या असं सुचवत आहे. प्रवास योग येईल. मध्यम दिवस. वृषभ राशीच्या द्वितीय स्थानात चंद्र आज आर्थिक शुभवार्ता देईल. मित्रमैत्रिणींना भेटण्याचा, सामाजिक जीवनात आनंद घेण्याचा उत्तम दिवस आहे. मिथुन कार्यक्षेत्रातील वाढती जबाबदारी तुम्हाला फलदायी ठरेल. जोडीदाराशी संबंध बिघडण्याची योग आहेत. आर्थिक घडामोडी होतील. आज काही महत्त्वाच्या भेटी होण्याची शक्यता आहे. दिवस शुभ. कर्क व्यय चंद्र असून धार्मिक गोष्टीत मन रमेल. संततीसंबंधी शुभ काळ. तणाव वाटेल. प्रवास होतील. एकूण दिवस समाधानात जाईल. सिंह आज चंद्राचा दिवसावर अनुकूल प्रभाव पडेल. फार ताण घेऊ नका. जास्तीचे काम पडेल. मित्रमैत्रिणी भेटतील. धार्मिक कार्य घडेल. दिवस समाधानात घालवा. कन्या दशम स्थानातील चंद्र कार्यालयीन कामात वाढ करेल. खरेदीसाठी बाहेर जाण्याचं ठरेल. घरगुती कार्यक्रम होईल. आनंद आणि उत्साहात दिवस पार पडेल. तूळ आज चंद्र उच्च प्रतीचे फळ देण्यास सज्ज आहे. शिक्षणआणि कार्यक्षेत्रात चांगला लाभ मिळेल. आर्थिक लाभ होतील. भाग्यदायक योग. दिवस चांगला. वृश्चिक संततीसाठी काही तरी विशेष करण्याचा दिवस आहे. दुपारनंतर सामाजिक जीवनात यश मिळेल. भाग्य उदयास येईल. आर्थिक लाभ होतील. उच्च शिक्षणासाठी काही खर्च होईल. विद्यार्थ्यांना उत्तम दिवस. धनु आज कार्यक्षेत्रातील महत्त्वाच्या घडामोडींकडे लक्ष असू द्या. सप्तम स्थानातील चंद्र जोडीदाराची उत्तम साथ देईल. तुमचे विरोधक सध्या बलवान आहेत. काळजी घ्या. दिवस शुभ. मकर प्रवास, घरामध्ये काही नवीन घटना, महत्त्वाचे फोन असा हा दिवस आहे. आर्थिक खर्च होतील. भावंडासोबत मजेत एकत्र घालवा. प्रवासाचे योग येतील. कुंभ आर्थिक लाभ करून देणारा दिवस आहे. राशीतील शनी सर्व बाजूने मदत करेल. काही कौटुंबिक कार्यक्रमात सहभाग घ्याल. संततीला वेळ द्या. कार्यक्षेत्रात यश. प्रकृती जपा. दिवस शुभ. मीन चतुर्थ स्थानातील चंद्र मनःस्वास्थ्य देईल. मात्र दिवस एकूण खूप गडबडीत जाणार आहे. प्रत्येक क्षेत्रात यशस्वी व्हाल. उत्तम असा दिवस आहे. शुभम भवतू!!
Published by:Priya Lad
First published:

Tags: Astrology and horoscope, Lifestyle, Rashibhavishya, Zodiac signs

पुढील बातम्या