Home /News /astrology /

आज अमावास्या, जपून राहा; तुमच्यावर काय परिणाम होणार पाहा तुमचं राशिभविष्य

आज अमावास्या, जपून राहा; तुमच्यावर काय परिणाम होणार पाहा तुमचं राशिभविष्य

फोटो सौजन्य - Shutterstock

फोटो सौजन्य - Shutterstock

आज ज्येष्ठ अमावस्या. चंद्र आज मिथुन राशीत असेल. या काळात उपासना, दान करणे इष्ट राहिल. पाहूया आजचे बारा राशींचे भविष्य.

आज दिनांक 28 जून 2022. मंगळवार. आज ज्येष्ठ अमावस्या. चंद्र आज मिथुन राशीत असेल. या काळात उपासना, दान करणे इष्ट राहिल. पाहूया आजचे बारा राशींचे भविष्य. मेष राशीमध्ये असलेले ग्रह मनस्थिती किंचित दोलायमान करतील. मंगळ राशी स्थानात राहूसोबत ही ग्रहस्थिती अचानक घडामोडी घडवेल. घरात फार काम पडेल. अमावस्या काळात जपून प्रवास करा. वृषभ राहू मंगळ भ्रमण स्त्रियांना चांगले नसून गुरू कार्यक्षेत्रात मदत करेल. शारीरिक ताण निर्माण होईल. धनस्थानात चंद्र सूर्य काही विशेष खर्च देतील. दिवस चांगला. मिथुन राशीमध्ये होणारी अमावस्या घातक असून काही नवीन अडचणी येतील. महत्त्वाचे संपर्क होतील. आर्थिक व्यय होतील .प्रकृती सांभाळा. दिवस मध्यम जाईल. कर्क चंद्र आज व्यय स्थानात आहे. घरी आणि कार्यक्षेत्रात धावपळ होईल. जास्तीची जबाबदारी येईल. प्रकृती मध्यम राहिल. अमावस्या कटकटीची जाऊ शकते. सिंह शनी सप्तम स्थानात वक्री तर रवी चंद्र लाभ स्थानात असून जवळच्या नातेवाईकांना शुभ. चंद्र अध्यात्मिक लाभ मिळवून देतील. दिवस ठीक आहे. कन्या आज आर्थिक चिंता आणि वैवाहिक आयुष्यात ताण देणारा दिवस आहे. घरात शांत रहा. फार ताण घेऊ नका. मन उदास वाटेल. ग्रहांचा प्रभाव जाणवेल. दिवस मध्यम जाईल. तूळ शनी पंचम तर भाग्य स्थानात चंद्र रवी आहेत. कार्यालयात काळजी घ्या. घरामध्ये मोठे खर्च निघतील. जोडीदाराची काळजी घ्या. भेटी होतील . दिवस बरा जाईल. वृश्चिक राशी स्वामी मंगळ षष्ठ स्थानात, शनी चतुर्थ स्थानात. हळूहळू परिस्थिती सुधारेल. अष्टम चंद्र आहे. आरोग्याची काळजी घ्या. अमावस्या चिंतेची जाईल. धनु तृतीय शनी आणि चतुर्थ गुरू शुभ असून घरामध्ये सुधारणा घडवून आणतील. सप्तम स्थानात चंद्र रवी आहे. अमावस्या जोडीदाराच्या काळजीची जाईल. दिवस शांत पणे घालवा. मकर शनी महाराज काही विशिष्ट ताण देतील. चंद्र आरोग्य चिंता निर्माण करेल. जोडीदार आनंदी राहिल. तुम्ही घरात व्यस्त राहाल. खर्च जपून करा. दिवस मध्यम. कुंभ धन स्थानातील गुरू आर्थिक लाभ देतील. राशीतील शनी जोडीदाराला त्रासदायक ठरेल. चंद्र राहू जपून राहण्याचे संकेत देत आहे. संततीची काळजी घ्या. अमावस्या मध्यम जाईल. मीन राशीतील गुरू आणि चंद्र आर्थिक उलाढाल दाखवत आहे. लाभ होतील. कार्यक्षेत्रात नवीन संधी मिळतील. दिवस गृह चिंतेचा ठरेल. शुभम भवतू!!
Published by:Priya Lad
First published:

Tags: Astrology and horoscope, Lifestyle, Rashibhavishya, Zodiac signs

पुढील बातम्या