Home /News /astrology /

राशीभविष्य: 'या' राशीच्या व्यक्तींना धनलाभाची शक्यता, जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस

राशीभविष्य: 'या' राशीच्या व्यक्तींना धनलाभाची शक्यता, जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस

आज सोमवार दिनांक 21 जून 2021 आज निर्जला एकादशी आहे. शुभ दिवस. आज कुंभ राशीत गुरू वक्री अवस्थेत जात आहे. आज माहिती घेऊया तुळा राशीबद्दल..

आज सोमवार दिनांक 21 जून 2021 आज निर्जला एकादशी आहे. शुभ दिवस. आज कुंभ राशीत गुरू वक्री अवस्थेत जात आहे. आज माहिती घेऊया तुळा राशीबद्दल.. काल पुरुषाच्या कुंडलीतील ही सातवी रास. वायु तत्त्वाची, चर, राशीचे चिन्ह तराजू  हातात घेतलेला पुरुष, त्यामुळे संतुलन हे या राशीचे ब्रीद असते. सडेतोड, न्यायी आणि व्यापारी वृत्तीचे  लोक असतात. राशीचा अंमल पोटाच्या खालील भागावर असतो. सडसडीत बांधा निमुळता, लांबट चेहरा, डोळे मोठे, कुरळे केस, देखण्या व्यक्ती असतात. शुक्र राशी स्वामी असल्यामुळे कलासक्त, सौंदर्याची आवड, उच्च अभिरुची असते. सूर्य या राशीत नीच असतो. ओम शु शुक्राय नम: हा जप करावा. आजचे बारा राशींचे भविष्य - मेष - आज आठवड्याचा पहिला दिवस मेष राशीच्या व्यक्ती आनंदात घालवतील. चंद्र शुक्राचे भ्रमण लाभदायी ठरेल. पती पत्नी एकमेकांना वेळ देतील. जोडीने निर्णय घेतील. शुभ दिवस. वृषभ - आज षष्ठ स्थानातील चंद्र भ्रमण, राशीतील राहू बुध. मनाला हुरहूर लावणारा दिवस आहे. मानसिक आंदोलने, थकवा, जाणवेल. आर्थिक बाजू उत्तम आहे. दिवस शांततेत  घालवा. मिथुन - आज काही नवीन कला  शिकावी असे वाटेल. त्यासाठी खर्च  करावा असे वाटेल. गुरु धार्मिक कार्यात रुची निर्माण करेल. तुमचा  दिवस आज मुलाबाळांसाठी खर्च  होईल . कर्क - चंद्र मंगळ आज दृष्टी योग करत आहेत. चतुर्थातील चंद्र भ्रमण, राशीतील मंगळ घरासाठी नवीन वस्तु, स्वतः साठी काही खरेदी, अशा अनेक इच्छा निर्माण करतील. दिवस  अनुकूल आहे. खर्च करा पण जपून. सिंह - आज  राशीच्या तृतीय  स्थानातील चंद्र भ्रमण, छोटे प्रवास, बहीण भावंड भेट, संपर्क दर्शवतात. बारावा मंगळ जपून राहा असे सांगतो. महत्त्वाचा फोन येईल. मुलाखतीतून यश मिळेल. कन्या - आजचा दिवस आर्थिक भरभराटीचा आहे. कुठूनतरी  पैसा मिळण्याची शक्यता आहे. कुटुंबाला वेळ द्या. आपल्या बोलण्याने दुसर्‍याला आनंद  द्याल. नोकरीत शुभ समाचार मिळतील. तुळ - आज चंद्र राशीतून भ्रमण करणार असून सूर्य मिथुन राशीत आहे. बुद्धीचा वापर करून एखाद्या पेच प्रसंगातून बाहेर पडा. गुरु चंद्र शुभ योग संतती संबंधी शुभ समाचार देईल. दिवस  चांगला आहे. वृश्चिक - राशीच्या व्यय स्थानातील चंद्र भ्रमण आज थकवा, सुस्ती देईल. आराम करावा अशी इच्छा होईल. जरूर करा. नवीन काम आज लांबणीवर टाका. दिवस मध्यम. धनू - जोडीदाराकडून लाभ होईल. वक्री शनि आर्थिक नियोजन करण्याचे सुचवतो आहे. भविष्याची तजवीज करा. भावंडाची चांगली साथ मिळेल. दिवस चांगला आहे. मकर - अत्यंत कष्टाळू मकर व्यक्तींवर आज कामाचा भरपूर ताण पडेल. राग आला तरी व्यक्त  करू नका. शत्रू टपले आहेत. सावध राहा. प्रकृतीची काळजी घ्या. दिवस  मध्यम आहे. कुंभ - भाग्यवंत दिवस. गुरु चंद्र शुभ योगाचे उत्तम लाभ होतील. दोन दिवस जाणवणारा ताण आज कमी होईल. ईश्वरी कृपा होईल. व्ययस्थानातील वक्री शनि सावध राहा असे सांगतो. मीन - आज दिवस काळजी घेण्याचा आहे. दगदग करू नका. पोटाचा त्रास असेल तर काळजी घ्या. आर्थिक नियोजन नीट करा. गुरु जप आणि दान करणे योग्य राहील. शुभम भवतु.!!
Published by:Karishma Bhurke
First published:

Tags: Astrology and horoscope, Rashibhavishya

पुढील बातम्या