Home /News /astrology /

Daily Horoscope : तब्येतीची काळजी घ्या; 'या' राशीच्या व्यक्तींना साथीच्या आजाराचा धोका

Daily Horoscope : तब्येतीची काळजी घ्या; 'या' राशीच्या व्यक्तींना साथीच्या आजाराचा धोका

Horoscope 01 June 2022 : 1 जून रोजी प्रकृतीच्या समस्या उद्भवण्याची शक्यता आहे. जाणून घ्या सविस्तर राशिभविष्य.

सितारा - द वेलनेस स्टुडिओच्या संस्थापिका पूजा चंद्रा (Pooja Chandra, Founder, Citaaraa - The Wellness Studio www.citaaraa.co) प्रसिद्ध जोतिषतज्ज्ञ असून, त्यांनी आपल्या ओरॅकल स्पीक्स या सदराच्या माध्यमातून प्रत्येक राशीचं 1 जून 2022 या दिवसासाठीचं भविष्य सांगितलं आहे. मेष (Aries) (मार्च 21 ते एप्रिल 19) दिवसाची सुरुवात काहीशी संथपणे होईल. मात्र दुपारनंतर उत्साह वाढेल. सध्या जे काम हाती घेतलं आहे, त्यावर संपूर्ण लक्ष केंद्रित करा. घरामध्येदेखील काही अनपेक्षित अशी आव्हानं उभी ठाकतील, ज्यामुळे तुमच्या कामात विलंब होईल. LUCKY SIGN – A Milestone वृषभ (Taurus) (एप्रिल 20 ते मे 20) एखादं मोठं आव्हान स्वीकारून तुम्ही ते यशस्वीपणे पार पाडाल. काही वाद झाल्यामुळे थोडा वेळ मन विचलित होईल; मात्र परिस्थिती लवकरच नियंत्रणात येईल. आपल्या रागावर नियंत्रण ठेवणं फायद्याचं ठरेल. LUCKY SIGN - Squirrel मिथुन (Gemini) (21 मे ते 21 जून) विविध कामांची डेडलाईन पाळणं शक्य होईल. एखादी गेलेली किंवा नाकारलेली संधी पुन्हा चालून येईल. त्यावर पुन्हा विचार करणं फायद्याचं ठरेल. LUCKY SIGN - Crystals कर्क (Cancer) (22 जून ते 22 जुलै) कामाच्या ठिकाणी काही सहकाऱ्यांमुळे पूर्वनियोजित प्रोजेक्टमध्ये अडथळे निर्माण होऊ शकतात. त्यामुळे दुसरा प्लॅनदेखील तयार ठेवा. आधी नियोजित केलेली एखादी छोटेखानी सहल आज पार पडेल. LUCKY SIGN – A Lamp सिंह (Leo) (23 जुलै ते 22 ऑगस्ट) दिवस अधिक विश्वासपूर्ण वाटेल. तुमच्या भविष्यातल्या योजना सादर करण्याची चांगली संधी आहे. सर्व गोष्टींची आधीच चर्चा करणं उत्तम. LUCKY SIGN – A milestone sign कन्या (Virgo) (23 ऑगस्ट ते 22 सप्टेंबर) तुम्ही स्वतःच्या मनावर विश्वास ठेवून पुढे वाटचाल करा. एखाद्या चर्चेमध्ये सहभागी असताना तुमचं मत विचारात घेतलं जाईल. एखादा क्लायंट विश्वासाने तुम्हाला मोठा प्रोजेक्ट ऑफर करू शकतो. LUCKY SIGN – Indoor Plant तूळ (Libra) (23 सप्टेंबर ते 23 ऑक्टोबर) भूतकाळातले काही गैरसमज दूर होऊ शकतात. जादा काम मिळाल्याने दिवसभर बिझी राहाल. काही अडचणींमुळे सुट्टी आवरती घ्यावी लागेल. तब्येतीची काळजी घ्या. साथीचे आजार होण्याचा धोका संभवतो. LUCKY SIGN – A photo frame वृश्चिक (Scorpio) (24 ऑक्टोबर ते 21 नोव्हेंबर) कामाच्या ठिकाणी वरिष्ठांचंच म्हणणं चालेल. तुम्ही आधीच एखाद्या गोष्टीची तयारी करणं शिकाल. गरज नसताना कोणतीही रिस्क घेऊ नका वा अशक्य असे वायदे करू नका. तब्येतीकडे लक्ष देण्याची गरज आहे. LUCKY SIGN – A New book धनू (Sagittarius) (22 नोव्हेंबर ते 21 डिसेंबर) दिवस आराम करण्याचा आहे. रिअल इस्टेटसंबंधी तुमचा सल्ला घेतला जाईल. एखाद्या गोष्टीवर बऱ्याच काळापासून काम सुरू असेल, तर पुनर्विचार करणं गरजेचं आहे. मनातली गुंतागुंत टाळण्यासाठी एक छोटासा ब्रेक फायद्याचा ठरेल. LUCKY SIGN – A Shimmering cloth मकर (Capricorn) (22 डिसेंबर ते 19 जानेवारी) दूरच्या मित्रांशी संपर्कात राहणं फायद्याचं ठरेल.  भरपूर कामही असेल आणि भरपूर मजाही कराल. तुमच्या मौल्यवान वस्तूंची काळजी घ्या. पोटाच्या समस्या उद्भवू शकतात. LUCKY SIGN – A Candle कुंभ (Aquarius) (20 जानेवारी ते 18 फेब्रुवारी) तुम्हाला एखादी हुशार, प्रेरणादायी व्यक्ती भेटण्याची शक्यता आहे. काम आणि घर दोन्ही ठिकाणच्या गोष्टी सावरण्याची संधी मिळेल. काही प्रमाणात चिंता राहील. त्यावर म्युझिक थेरपी फायद्याची ठरेल. LUCKY SIGN – A code word मीन (Pisces) (19 फेब्रुवारी ते 20 मार्च) अचानक एखादं क्लिष्ट काम मागे लागेल. तुमच्या आजूबाजूला सुरू असलेलं एखादं गॉसिप टाळता येणार नाही. जवळचे मित्र तुम्हाला साथ देतील. LUCKY SIGN – A wooden box
First published:

Tags: Astrology and horoscope, Lifestyle, Rashibhavishya, Zodiac signs

पुढील बातम्या