मराठी बातम्या / बातम्या / Viral / घरात निघाला किंग कोब्रा; व्यक्तीने हातात पकडून दोरीसारखा फिरवला पण..., Shocking Video

घरात निघाला किंग कोब्रा; व्यक्तीने हातात पकडून दोरीसारखा फिरवला पण..., Shocking Video

अजिबातही न घाबरता त्याने मागून कोब्राची शेपटी पकडली आणि मग त्याला दोरीसारखं फिरवायला सुरुवात केली. जेव्हा साप फिरू लागला तेव्हा त्याने..

अजिबातही न घाबरता त्याने मागून कोब्राची शेपटी पकडली आणि मग त्याला दोरीसारखं फिरवायला सुरुवात केली. जेव्हा साप फिरू लागला तेव्हा त्याने..


नवी दिल्ली 02 एप्रिल : कोब्रा किंवा विषारी साप घरात आल्यावर एकच खळबळ उडते. पण अलीकडच्या काळात सोशल मीडियावर असे अनेक व्हिडिओ समोर आले आहेत, ज्यात लोक मजेदार पद्धतीने साप पकडताना दिसतात. मात्र कधीकधी हे धोकादायकही ठरतं, कारण हे साप बऱ्याचदा माणसांना चावतातही. सध्या सापाचा असाच एक व्हिडिओ समोर आला आहे.

Video : झोपलेल्या वाघाला बघताच स्तब्ध उभा राहिले हरिण, तेवढ्यात वाघ उठला आणि...

नुकताच हा व्हिडिओ एका यूजरने सोशल मीडियावर शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये दिसतं, की एक व्यक्ती घरामध्ये बसलेला असतानाच त्याला घरात एक कोब्रा शिरल्याचं दिसतं. यानंतर अजिबातही न घाबरता त्याने मागून कोब्राची शेपटी पकडली आणि मग त्याला दोरीसारखं फिरवायला सुरुवात केली. जेव्हा साप फिरू लागला तेव्हा त्याने दुसऱ्या हाताने त्याचा फणाही पकडला.

एवढंच नाही तर त्याने कोब्राचं एक टोक उजव्या हाताने आणि दुसरं टोक डाव्या हाताने पकडलं. या व्यक्तीने नागाला पूर्णपणे ताब्यात घेतलं. व्हिडिओच्या शेवटच्या भागात तो आपल्या पंजाने कोब्राचा जबडा पूर्णपणे दाबून ठेवला असल्याचं दिसतं. हे दृश्यच अतिशय भीतीदायक वाटतं. किंग कोब्रा हा अतिशय विषारी नाग आहे, अशात तो चावल्यास या व्यक्तीचा जीवही जाऊ शकत होता.

शेवटी ती व्यक्ती घराचा दरवाजातून बाहेर पडत त्या नागाला बाहेर घेऊन जाते. या व्हिडिओवर संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच काही लोक त्या व्यक्तीवर संतापले आणि त्याने जीव धोक्यात घालून असा स्टंट केल्याचं म्हणू लागले. हा व्हिडिओ आतापर्यंत 45 हजारहून अधिकांनी पाहिला आहे, तर अनेकांनी लाईकही केला आहे.

First published: April 02, 2023, 15:12 IST
top videos
  • Nagpur News: विदर्भातील सर्वात मोठं फुलांचं मार्केट माहितीये का? दिवसाला होते 40 लाखांची उलाढाल, Video
  • Wardha News: महात्मा गांधींनी सुरू केलेल्या भांडारातून ताक कधी प्यायला का? Video
  • Pune News : राज्यावर येणार जल संकट, ज्योतिषांनी वर्तवला चिंता व्यक्त करणारा अंदाज VIDEO
  • Pune News : श्रीमंत दगडूशेठ गणपती चरणी माऊलींचे अश्व नतमस्तक, पाहा Video
  • Weather Update: पाऊस कधी येणार, काय घ्यावी खबरदारी? हवामान विभागाचा शेतकऱ्यांसाठी अलर्ट, Video
  • Tags:King cobra, Snake video

    ताज्या बातम्या

    सुपरहिट बॉक्स