मराठी बातम्या / बातम्या / Viral / बाजारात येणार नशामुक्त दारू, कितीही प्या तरी नाही होणार हँगओव्हर

बाजारात येणार नशामुक्त दारू, कितीही प्या तरी नाही होणार हँगओव्हर

प्रतिकात्मक फोटो

मद्यपान केल्यानंतर तुमचे लक्ष विचलित होते का? दारू पिल्यानंतर तुम्हाला हँगओव्हरचा त्रास होतो का? तुमची ही समस्या लवकरच संपणार.


दारू पिणं ही गोष्ट हल्ली खूप सामान्य बनली आहे. अनेकांना मद्यपान आवडतं; पण नशा आवडते; पण नंतर येणारा हँगओव्हर मात्र अनेकांना आवडत नाही. दारू तर हवी मात्र हा हँगओव्हर नको असलेल्यांसाठी आता नशा-फ्री दारू बाजारात येणार आहे.

कोणी मन हलकं करण्यासाठी दारू पितं, तर कोणी आवड म्हणून पितं. दारू शरीरात गेली, की थोड्याच वेळात शुद्ध हरपू लागते. जास्त प्यायली, तर हळूहळू मनावरचा ताबा सुटू लागतो. शरीराचाही तोल सांभाळणं अवघड होतं. नशा उतरल्यानंतर येणारा हँगओव्हर मात्र अनेकांना अजिबात आवडत नाही. त्यांच्यासाठी बाजारात येणारी नवी नशा-फ्री दारू नक्कीच काम करेल. 2025मध्ये ही खास दारू बाजारात येणार आहे.

ही दारू प्यायल्यानंतर नशा आल्यासारखं थोडं वाटेल; पण हँगओव्हर होणार नाही. ही दारू प्यायल्यानंतर कोणीही नशेत कोणतीही चुकीची गोष्ट करणार नाही आणि मनावरचा ताबाही सुटणार नाही असं ही दारू तयार करणाऱ्यांचं मत आहे. माजी सरकारी ड्रग्ज सल्लागार प्राध्यापक डेव्हिड नट यांनी ही दारू तयार केलीय. तिचं नाव एलकारेल असं ठेवण्यात आलंय. एखादी व्यक्ती जास्त दारू पिऊ शकत नसेल, केवळ थोडीशी नशा चढली तर चालत असेल, तर ही दारू अशा व्यक्तींसाठी उत्तम असल्याचं डेव्हिड यांना वाटतं. एक ग्लास वाइनइतकाच याचा परिणाम होईल. ही दारू खूप जास्त प्यायली तरीही त्यामुळे खूप नशा चढणार नाही, असं ते सांगतात.

ब्रेक-अपचा धक्का पचवणं होईल सोपं, तज्ज्ञांनी सांगितले सोपे आणि इंटरेस्टिंग उपाय

डेव्हिड हे लंडनच्या इम्पिरियल कॉलेजमध्ये शास्त्रज्ञ आहेत. त्यांच्या मते ही दारू प्यायल्यानं हँगओव्हर होणार नाही. ही दारू इतर काही पेयांसोबत मिसळली जाऊ शकते. त्याचा परिणाम 15 मिनिटांमध्ये जाणवू लागेल. डेव्हिड यांच्या म्हणण्यानुसार, या दारूमुळे कर्करोग होण्याचा धोका नाही. असं असलं तरी ही दारू क्वचितच प्यावी असंही ते सांगतात. 2025मध्ये हे उत्पादन बाजारात येईल असं वेबसाइटवर लिहिलं असून त्याची निश्चित तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही.

या उत्पादनामुळे जास्त नशा होत नाही; पण दारू प्यायल्याचं फीलिंग येऊ शकतं. त्यामुळे दारू पिणाऱ्यांसाठी हे उत्पादन इंटरेस्टिंग ठरू शकेल.

First published: March 28, 2023, 23:04 IST
top videos
  • Chhatrapati Sambhaji Nagar News : शेतकऱ्यांनो, मान्सूनपूर्व कापसाची लागवड करताय? ‘हा’ आहे धोका, पाहा Video
  • Pune News : राजा-सोन्याच्या बैल जोडीला संत तुकाराम महाराजांच्या पालखीसाठी मान, पाहा कशी मिळाली संधी Video
  • Solapur News : शेतकऱ्यानंचं तयार केलं फळबागांसाठी खास यंत्र, कमी पैशात मिळणार मोठा फायदा, Video
  • Dombivli News : अंत्यविधीसाठी मिळणार 5 हजारांची मदत, KDMC ची अशी आहे अट Video
  • Mumbai News : काहीही! कधी खाल्ला का टोमॅटो वडापाव? एकदा VIDEO तर पाहा
  • Tags:Alcohol

    ताज्या बातम्या

    सुपरहिट बॉक्स