लाईव्ह रिपोर्टिंगदरम्यान महिला रिपोर्टरची छेडछाड

जूलिएथ गोंजालेज थेरन ही महिला एका जर्मन टीव्ही चॅनलसाठी रिपोर्टिंग करत होती.

Sachin Salve
रशिया,23 जून : फीफा वर्ल्डकपसाठी रशियामध्ये फुटबाॅलप्रेमींनी एकच दर्दी गर्दी केलीये. पण याच वर्ल्डकपचं रिपोर्टिंग करत असलेल्या महिला रिपोर्टरसोबत छेडछाड झाल्याची लज्जास्पद घटना घडलीये.जूलिएथ गोंजालेज थेरन ही महिला एका जर्मन टीव्ही चॅनलसाठी रिपोर्टिंग करत होती. लाईव्ह रिपोर्टिंग चालू असतानाच एका फुटबॉल चाहत्यानं या महिला रिपोर्टरसोबत छेडछाड केली आणि तो तेथून निघून गेला.  लाईव्ह रिपोर्टिंग सुरू असल्यानं हे सगळं दृश्य कॅमेरात कैद झालंय.

पुण्यात प्रेमसंबंधातून तरुणाची निर्घृण हत्या, धडापासून शीर केलं वेगळं

या महिला रिपोर्टरने या घटनेचा व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर केला. "सन्मान!, अशा प्रकारच्या घटना आमच्यासोबत घडाव्यात यासाठी आम्ही नाहीत. आमचं काम हे महत्त्वाचं आहे आणि आम्ही व्यावसायिकपणे वागतो. आम्ही फुटबाॅलबद्दलचा आनंद शेअर केलाय. पण आम्हाला प्रेम आणि शोषण दरम्यान अंतर किती आहे जाणून घेता आलं पाहिजे."याला म्हणतात साधेपणा!, जगातल्या सर्वात श्रीमंत माणसाने सर्वसामन्याप्रमाणे पाहिली वेरूळ लेणी! ती पुढे म्हणते, "मी घटनास्थळावर 2 तास रिपोर्टिंगसाठी उभी होती पण तोपर्यंत असं काही घडलं नाही. पण जेव्हा आम्ही लाईव्ह रिपोर्टिंग सुरू केलं तेव्हा एका फुटबाॅलप्रेमीने हा प्रकार केला. त्यानंतर मी त्या व्यक्तीला शोधण्याचा प्रयत्न केला पण तो फरार झाला होता"या प्रकारानंतर जगभरातून मीडियातून तीव्र निषेध व्यक्त होतं. ज्या व्यक्तीने हा प्रकार केला त्याने समोर येऊन माफी मागितली.

Trending Now