फीफा वर्ल्ड कप 2026 चं यजमानपद अमेरिका,मेक्सिको आणि कॅनडाला

यापुढच्या म्हणजे 2016 मध्ये होणाऱ्या फीफा वर्ल्ड कपचं यजमानपद अमेरिका, मेक्सिको आणि कॅनडाला मिळालं आहे.

Ajay Kautikwar
मॉस्को,ता.13 जून : सध्या सगळ्या जगाचं लक्ष लागलंय ते रशियात सुरू होणाऱ्या 'फीफा वर्ल्ड कप 2018'कडे फुटबॉलचा हा महाकुंभ सुरू होण्यास फक्त आता एक दिवस राहिला आहे. तर यापुढच्या म्हणजे 2026 मध्ये होणाऱ्या फीफा वर्ल्ड कपचं यजमानपद अमेरिका, मेक्सिको आणि कॅनडाला मिळालं आहे.मॉस्कोत आज निवड समितीच्या झालेल्या बैठकीत या तीन देशांची निवड करण्यात आली. फीफा फेडरेशनमध्ये असलेल्या सदस्य देशांनी अमेरिका, मेक्सिको आणि कॅनडाच्या बाजून आपलं वजन टाकलं. या तीन देशांना 134 तर मोरक्कोला 65 मतं पडली.2026 मध्ये होणाऱ्या वर्ल्ड कपमध्ये 48 टिम्स खेळणार असून 80 सामने होणार आहेत. त्यातले 60 अमेरिकेत आणि प्रत्येकी 10 मेक्सिको आणि कॅनडात होणार आहेत.

फुटबॉलच्या वर्ल्डकपचं यजमानपद मिळवण्यासाठी मोरक्को गेल्या 30 वर्षांपासून प्रयत्न करत आहे मात्र प्रत्येक वेळी मोरक्कोच्या पदरी निराशाच वाट्याला येते.  

Trending Now