2019 सत्ता आली तर आंध्राला विशेष राज्याचा दर्जा देणार -राहुल गांधी

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जिथे भाजपचे सरकार नाही अशा राज्यांना मदत करत नाही.

बर्लिन, 24 आॅगस्ट : जर 2019 मध्ये काँग्रेसची सत्ता आली तर आंध्रप्रदेशला विशेष राज्याचा दर्जा देणार असं आश्वासन काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी दिलंय. राहुल गांधी हे बर्लिनच्या दौऱ्यावर आहे. यावेळी त्यांनी तिथे भारतीयांशी संवाद साधला.पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जिथे भाजपचे सरकार नाही अशा राज्यांना मदत करत नाही. पंतप्रधान मोदी हे भाजपशासीत राज्यांना नेहमी पाठिंबा देतात. पण जेव्हा दुसऱ्या राज्यात जिथे भाजपचे सरकार नाही अशा पक्षांकडे ते लक्ष्य देत नाही असा आरोपही राहुल गांधींनी केला.मागील महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत आंध्रप्रदेशला विशेष राज्याचा दर्जा का देऊ शकत नाही याबद्दल निवदेन दिले होते. एनडीए सरकारने आंध्राच्या जनतेचा आशा आणि अपेक्षेचा सन्मान करतोय. पण त्यांनीही हे लक्ष्यात घ्यावेळी भारत सरकार हे 14 व्या वित्त आयोगाच्या सुचनेसाठी बांधील आहे. त्यामुळे आंध्राला एक विशेष पॅकेज दिले आहे. ज्या विशेष राज्यांना सुविधा मिळतात त्या या पॅकेजमधून मिळतील असं आश्वासन मोदींनी दिलं होतं.

राहुल गांधींनी मोदींच्या या आश्वासनावर आक्षेप घेतला. मुळात ज्या राज्यात भाजप सरकार नाही तिथे मोदी लक्ष्य देत नाही असा आरोप केला. तसंच राहुल गांधी यांनी संघावरही सडकून टीका केली. आरएसएस हा भारतात समाजांमध्ये तेढ निर्माण करण्याचे काम करत आहे. संघाला देशातील प्रत्येक संस्थेवर कब्जा करायचा इरादा आहे. पण आम्ही तसे होऊ देणार नाही अशी टीका राहुल गांधींनी केली.बर्थडे स्पेशल : करमाळा ते बॉलिवूड...एका 'सैराट'काराचा प्रवास

Trending Now