लंडनमध्ये विजय माल्ल्या करतोय तिसऱ्यांदा लग्न

भारतीय बँकांना ९ हजार कोटींचा चुना लावणारा मद्यसम्राट विजय मल्ल्या तिसऱ्या लग्नाच्या तयारीत असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. विजय मल्ल्या ज्या मुलीशी लग्न करणार आहे त्या मुलीचे नाव पिंकी लालवाणी आहे.

Sonali Deshpande
27 मार्च : भारतीय बँकांना ९ हजार कोटींचा चुना लावणारा मद्यसम्राट विजय माल्ल्या तिसऱ्या लग्नाच्या तयारीत असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. विजय माल्ल्या ज्या मुलीशी लग्न करणार आहे त्या मुलीचे नाव पिंकी लालवाणी आहे. माल्ल्या देश सोडून पळाला तेव्हा तीदेखील त्याच्यासोबत पळाली होती अशीही माहिती समोर येते आहे.पिंकी लालवाणी ही एअरहाॅस्टेस होती. किंगफिशरमध्येही ती काम करायची. लंडनमध्ये ते एकत्रच राहात होते. 62 वर्षाच्या विजय मल्ल्यानं आता तिच्याशी लग्न करायचा निर्णय घेतलाय.आर्थिक फसवणूक केल्याचा खटला त्याच्यावर सुरू आहे. तरीही विजय माल्ल्याचे नाव पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.

Trending Now