"तू, तू है वही...दिल ने जिसे...",जिनपिंग बॉलिवूडच्या प्रेमात!

मी बॉलिवूडचे काही चित्रपट पाहिले आहेत, ते चित्रपट मला आवडतात असं जिनपिंग यांनी मोदींना सांगितलं.

Sachin Salve
वुहान,ता.२८ एप्रिल: गेल्या काही वर्षात बॉलिवूडच्या चित्रपटांनी चीनमध्ये धम्माल कलीय. यात आघाडी घेतली होती ती अमिर खानच्या ‘दंगल’नं. आज मोदी आणि जिनपिंग यांच्या दिवसाची सुरुवात झाली ती बॉलिवूडच्या गाण्यांनी..ईस्ट लेकच्या शाही गेस्ट हाऊसमध्ये चिनी कलाकारांनी दोन्ही नेत्यांच्या समोर बॉलिवूडमधली काही गाणी वाजवून दाखवली. १९८० च्या दशकातला प्रसिध्द चित्रपट 'ये वादा रहा' मधलं "तू, तू है वही... दिल, ने जिसे अपना कहा...तू है जहां, मैं हूं वहां" हे गाण्याची धून चिनी कलाकार वाजवत असताना दोन्ही नेते समरसून या गाण्याची धून ऐकत होते. त्यानंतरच्या चर्चेतही बॉलिवूडचा मुद्दा आला.मी बॉलिवूडचे काही चित्रपट पाहिले आहेत, ते चित्रपट मला आवडतात असं जिनपिंग यांनी मोदींना सांगितलं. या क्षेत्रातही दोन्ही देश सहकार्य करू शकतात असं मतही या नेत्यांनी व्यक्त केलं. त्यामुळं आता बॉलिवूडला नवं डेस्टिनेशन खुलं होणार आहे.

Trending Now