डोनाल्ड ट्रम्प यांचा रशियाला इशारा, खबरदार आमचंही मिसाईल येतेय...

Ajay Kautikwar
वॉशिंग्टन,ता.11 एप्रिल: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाला धमकीच दिलीय. रशियाने सीरियावर डागलेलं प्रत्येक मिसाईल पाडलं जाईल असं ट्रम्प यांनी जाहीर केलंय. सीरियाच्या मुद्यावरून अमरिका आणि रशियामध्ये प्रचंड तणाव वाढलाय. याची कबूली ट्रम्प यांनी ट्विटरवरूनच दिलीय. आज एकामागून एक केलेल्या ट्विट्समध्ये रशियावर टीकेची झोड उठवलीय. सध्याच्या काळात कधी नव्हे एवढे दोन्ही देशांचे संबंध तणावपूर्वी बनले आहेत. शितयुद्धाच्या काळातही ते संबंध एवढे खराब नव्हते. रशियाला आपल्या अर्थव्यवस्थेसाठी अमेरिकेची गरज आहे. त्यामुळं रशियानं शस्त्रास्त्रांची स्पर्धा रोखली पाहिजे.सीरियाचे अध्यक्ष बशर अल असाद यांचं समर्थन करण्यावरूनही त्यांनी रशियावर टीका केली. रासायनिक अस्त्रांचा उपयोग करण्याऱ्या असाद यांना रशिया पाठीशी घालत असल्याचा आरोपही त्यांनी केला. दोन्ही देशांमध्ये स्पर्धा असते मात्र मतभेद एवढ्या टोकाला कधीच गेले नाहीत असंही त्यांनी स्पष्ट केलं.सीरियाचे अध्यक्ष बशर अल असाद यांच्या सरकारला रशियाचा पाठिंबा आहे, तर कुठल्याही परिस्थितीत असाद यांनी पायऊतार व्हावं असा अमेरिकेचा दबाव आहे.

trump warns russia missiles will we coming in syria

Trending Now