इराणशी झालेल्या अणुकरारातून अमेरिकेने घेतली माघार !

२०१५मध्ये इराणशी झालेल्या अणुकरारातून माघार घेत असल्याची घोषणी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काल रात्री केली.

Renuka Dhaybar
09 मे : २०१५मध्ये इराणशी झालेल्या अणुकरारातून माघार घेत असल्याची घोषणी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काल रात्री केली. इराण दहशतवाद्यांना मदत करत असल्याचा आरोपही ट्रम्प यांनी केला आहे. बराक ओबामांच्या काळात इराणशी झालेल्या या अणुकराराला डोनाल्ड ट्रम्प यांनी विरोध दर्शवला होता.दरम्यान, या करारातून अमेरिका माघार घेईल, असे संकेतही त्यांनी दिले होते. आणि यानुसार मंगळवारी डोनाल्ड ट्रम्प यांनी या करारातून अमेरिका माघार घेत असल्याची घोषणा केली. त्यामुळे आंतराष्ट्रीय वर्तुळात ही एक मोठी बाब आहे.ट्रम्प यांचा या कराराला नेहमीच विरोध केला आहे. या करारानुसार, इराणकडून अनेक आर्थिक मंजुरी काढून घेण्यात आल्या. ईरानने हे सर्व निर्बंध स्वीकारले असल्यामुळे त्यांना परमाणु कार्यक्रम पुढे चालू ठेवणे जवळजवळ अशक्यच आहे.

पण दरम्यान इराणशी असलेला करार संपवल्यानंतर इतर देश म्हणजे ब्रिटेन, फ्रांस, चीन, जर्मनी और रशियाही हा करार करणार आहे की नाही याबाबत घोषणा करू शकतात. 

Trending Now