जोंग-ट्रम्प भेटीची तारीख आणि ठिकाण अखेर ठरलं!

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग उन 12 जूनला सिंगापूर इथं भेटणार आहेत.

Ajay Kautikwar
वॉशिंग्टन,ता.10 मे: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग उन यांच्या भेटीची तारिख आणि ठिकान अखेर जाहीर झालंय. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विटरवरून ही माहिती दिली. 12 जून ला सिंगापूरमध्ये ही ऐतिहासिक भेट होणार असून सर्व जगाचं लक्षं त्याकडे लागलं आहे.अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माइक पोम्पियो हे उत्तर कोरियाच्या दौऱ्यावर गेले होते. त्यांनी किम जोंग उन ची भेट घेऊन चर्चा केली. त्यानंतर तारिख आणि ठिकान फायनल झालं. या भेटीच्यावेळी काही सकारात्मक घडणार नसेल तर मी चर्चेतून बाहेर पडेल असं या आधीच डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केलं आहे.

Trending Now