PHOTOS : अखेर ब्रॉक लेसनर हरला, 'हा' आहे नवा WWE युनिव्हर्सल चॅम्पियन !

504 दिवस सलग WWE युनिवर्सल चॅम्पियन असलेल्या ब्राॅक लेसनरला अखेर पराभवाचा सामना करावा लागला. रोमन रेन्सने ब्रॉक लेसनरला पराभूत करून अखेर WWE युनिवर्सल चॅम्पियन चा किताब पटकावलाय. ब्राॅक लेसनर गेल्या 504 दिवसांपासून WWE युनिवर्सल चॅम्पियन होता. लेसनरला ज्यांनी आव्हान दिलं त्याला पराभूत केलं. एवढंच नाहीतर ब्राॅकने अंडरटेकरला हरवलं होतं त्यामुळे अंडरटेकरने निवृत्ती घेतली होती. ब्राॅक आणि रोमन रेन्समध्ये तीनवेळा लढत झाली. पण तिन्ही वेळा ब्रॉकला धोबीपछाड दिला होता. पण अखेर Roman Reignsने समरस्लॅम 2018 मध्ये रोमन रेन्सने ब्रॉकला धूळ चारली.

ब्रॉक लेसनर आणि रोमन रेन्समध्ये जवळपास 6 मिनिटं 10 सेकंद मुकाबला रंगला. रोमन रेन्सने ब्रॉकवर जोरदार हल्ला चढवला. तर दुसरीकडे ब्रोन स्ट्रोमननेही त्यावेळी हजेरी लावली. ब्रॉननेकडे Money in The Bank चा बॉक्स आहे ज्याने तो कोणत्याही चॅम्पियनला कोणत्याही क्षणी आव्हान देऊ शकतो. ब्रॉन हे मोक्याच्या संधीची वाट पाहत होते पण ब्रॉकने रिंगच्या खाली उतरून ब्रॉनची धुलाई केली आणि Money in The Bank चा बॉक्स दूर फेकून दिला. रोमन रेन्सने याचाच फायदा घेत रिंगमध्ये ब्रॉक आल्यावर जोरदार हल्ला चढवला आणि ब्रॉकला पराभूत केलं. समरस्लॅमचा महामुकाबला अमेरिकेतील न्यूयॉर्कमध्ये झाला. WWE Network च्या मते एक लाखांपेक्षा जास्त लोकांनी हा सामना पाहिला.

Trending Now