शाहरूख खानची बहीण पाकिस्तानमधून लढवणार निवडणूक

बॉलिवूडचा बादशहा असणाऱ्या शाहरूख खानची चुलत बहीण नूरजहां पाकिस्तानच्या पेशावरमधून निवडणूक लढवणार असल्याचे समोर येत आहे.

Sonali Deshpande
08 जून : बॉलिवूडचा बादशहा असणाऱ्या शाहरूख खानची चुलत बहीण नूरजहां पाकिस्तानच्या पेशावरमधून निवडणूक लढवणार असल्याचे समोर येत आहे. इंडियन एक्सप्रेसच्या माहितीनुसार पाकिस्तानमध्ये होणाऱ्या आगामी निवडणुकीत नूरजहां निवडणुकीला उभी राहणार आहे. तिला निवडणूक आयोगाकडून नामांकन पत्रही मिळालं आहे. नूरजहां पाकिस्तानच्या PK-77 या मतदार संघातून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुकीला उभी राहणारेय.नूरजहांचा भाऊ तिच्या सर्व प्रचारसभाची जबाबदारी घेणार आहे. नूरजहांने एका पाकिस्तानी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीनुसार ती महिला सक्षमीकरणाकडे जास्त लक्ष देणार आहे.नूरजहां आत्तापर्यंत दोन वेळा भारतात शाहरूख खानकडे आली आहे. दोन्ही परिवारांमध्ये जवळचे संबंध आहेत. भारत-पाकिस्तानातला तणाव बहीण भावांच्या नात्यात अडसर होत नाही.

Trending Now