स्मार्टफोनच्या अति वापरानं होतेय नैराश्यात वाढ, अमेरिकेतल्या संशोधनात निष्कर्ष

अमेरिकेच्या कोलंबिया विद्यापीठानं स्मार्टफोनचा मुलांवर होणाऱ्या परिणामांबाबत केलेल्या सर्व्हेत बाहेर आलेले निष्कर्ष धक्कादायक आहेत.

Sonali Deshpande
28 जानेवारी : सध्याच्या डिजिटल युगात सगळ्यात जवळचा मित्र कोण असं विचारलं तर त्याचं उत्तर आहे, आपला स्मार्टफोन.पण स्मार्टफोनसोबत असलेल्या मैत्रीचं रूपांतर व्यसनात झाल्यानं मुलांमध्ये नैराश्य येत असल्याचा निष्कर्ष अमेरिकेतल्या एका संशोधनात काढण्यात आलाय.स्मार्टफोन हा आता आपल्या दररोजच्या जगण्याचा भाग झालाय. एका क्लिकवर सर्व जगाशी कनेक्ट आणि माहितीचा ओघ असल्यानं अपडेट राहण्यासाठी स्मार्टफोनशी सर्वांची जवळीक वाढलीय. पण हीच जवळीक आता घातक ठरू लागलीय. अमेरिकेच्या कोलंबिया विद्यापीठानं स्मार्टफोनचा मुलांवर होणाऱ्या परिणामांबाबत केलेल्या सर्व्हेत बाहेर आलेले निष्कर्ष धक्कादायक आहेत.काय आहे संशोधन?

अमेरिकेतले 33 टक्के मुलं नैराश्यानं ग्रस्तअल्पवयीन मुलांच्या आत्महत्येच्या घटनांमध्ये 23 टक्क्यांची वाढमुलं दररोज सरासरी 5 तास स्मार्ट फोनवर वेळ खर्च करतातस्मार्टफोन सोबत असलेल्या मैत्रीचं केव्हा व्यसनात रूपांतर होतं हे मुलांना कळतही नाही. हिंसेला प्रोत्साहन देणाऱ्या खेळांचे भरमसाठ अॅप्स आणि पॉर्न फिल्म्स मुलांना सहज उपलब्ध होत असल्यानं रात्री उशिरापर्यंत मुलं स्मार्टफोनवर सर्फिंग करतात. त्यामुळं त्यांची झोपही नीट होत नाही.त्याचा परिणाम मुलांच्या आरोग्यावर होतो.अपुरी झोप, धावपळीचं जीवन, कामाच्या व्यस्ततेमुळं आई वडिलांचं मुलांकडे होत असलेलं दुर्लक्ष यामुळं मुलांवर सध्या नियंत्रण राहिलेलं नाही. त्याचबरोबर इंटरनेटच्या महाजालातल्या माहितीला चाळणी नसल्यानं घातक गोष्टींना मुलं बळी पडतात आणि त्याचा त्यांच्या मनावर वाईट परिणाम होतो.पालक, समाज आणि शिक्षक त्याचबरोबर माध्यमांनी वेळीच उपायोजना केली नाही तर परिस्थिती हाताबाहेर जाऊ शकते असा इशाराही तज्ज्ञांनी दिला आहे

Trending Now