शार्क मासे माणसांपेक्षा बुद्धिमान, संशोधनात सिद्ध

एका संशोधनाद्वारे हे समोर आलंय की शार्क मासे माणसांपेक्षा बुद्धिमान असू शकतात. वैज्ञानिकांच्या म्हणण्याप्रमाणे, शार्कला ट्रेनिंग दिलं, तर ते जॅझ संगीत पसंत करतात.

Sonali Deshpande
10 मे : एका संशोधनाद्वारे हे समोर आलंय की शार्क मासे माणसांपेक्षा बुद्धिमान असू शकतात. वैज्ञानिकांच्या म्हणण्याप्रमाणे, शार्कला ट्रेनिंग दिलं, तर ते जॅझ संगीत पसंत करतात.आॅस्ट्रेलियातल्या एका विद्यापीठात शास्त्रज्ञांनी शार्कच्या पिल्लावर प्रयोग केलाय. त्यात असं आढळून आलंय की जॅझ संगीत वाजवलं की शार्क पदार्थ खाण्यासाठी स्वत:हून पोचतो.शास्त्रज्ञ कॅटरिना विला पोकानं सांगितलं, पाण्यातल्या जिवांसाठी ध्वनी महत्त्वाचा असतो. पाण्यात आवाजाची गती जोरदार असते. मासे आपलं अन्न स्वत:च शोधत असतात. ध्वनीमुळे त्यांना संकटंही कळतात. ते एकमेकांशी संवादही साधतात.

शार्क मासे जहाजांचे आवाज, होडीचे आवाज आणि अन्न यांचा संबंध जोडू शकतात. अॅनिमल काॅग्निशन या पुस्तकात हे संशोधन प्रसिद्ध झालंय.

Trending Now