आफ्रिकेत एड्स कार्यकर्त्यांनी औषधांच्या बदल्यात ठेवले शरीर संबंध, वेश्यांचा केला वापर

सामाजिक कल्‍याण संस्था मेडिसीन्स सँस फ्रंटियर्स (एमएसएफ) च्या एड्स कार्यकर्त्यांनी अफ्रिकेत वेश्यांचा वापर केला आहे.

Renuka Dhaybar
आफ्रिका, 22 जून : सामाजिक कल्‍याण संस्था मेडिसीन्स सँस फ्रंटियर्स (एमएसएफ) च्या एड्स कार्यकर्त्यांनी अफ्रिकेत वेश्यांचा वापर केला आहे. बीसीसीच्या वृत्तानुसार, या कार्यकर्त्यांनी लैंगिक संबंधाबदल्यात औषधांची देवाणघेवाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.गैर सरकारी संस्थांच्या सांगण्यानुसार, हा प्रकार धक्कादायक आहे, आणि यावर कठोर कारवाई करण्यात येईल. पण याबद्द्ल अद्याप कोणतेही पुरावे हाती लागले नाहीत. त्यामुळे साक्षीदारांना पुढे येण्याचं आवाहन  करण्यात आलं आहे.

हेही वाचा...

दुचाकीस्वाराला वाचवण्याच्या नादात शिवनेरी बस दुभाजकाला धडकून झाली पलटी !

लोक व्हिडिओ काढत बसले म्हणून ट्रेनखाली तुटलेला पाय स्वत:च उचलून प्लॅटफॉर्मवर चढला !

केनियामध्ये तैनात असलेल्या एमएसएफच्या निवासस्थानाच्या ठिकाणी मुलींना आणणाऱ्या एका वरिष्ठ कर्मचाऱ्याला एका पत्रकाराने पाहिलं आहे. याविषयी बोलताना तो म्हणाला की, 'त्या मुली खूप लहान होत्या आणि त्यांना सांगण्यात आलं होतं की ते वेश्या आहेत.'दरम्यान, माजी कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात आलं की, लैंगिक संबंध ठेवण्यासाठी वेश्या इथं आणल्या जातात. त्यांना औषधांबदल्यात लैंगिक संबंध ठेवण्यासाठी त्यांचा वापर केला जातो.संबंधित पोलीस आणि इतर संस्था यासंबंधात चौकशी करत आहेत. पण हा सगळा प्रकार उघडकीस आणण्यासाठी लोकांनी पुढे यावं असं आवाहन करण्यात आलं आहे.

हेही वाचा...

VIDEO : डॉक्टराची क्रूरता ; 9 परदेशी कुत्रे भुकेपोटी आपलीच खात होते विष्ठा !

VIDEO : तरुणीचे कारवरील नियंत्रण सुटले, पाच जणांना उडवले

VIDEO : गोंदियात किडनी चोराच्या संशयावरुन भिकाऱ्याचा घेतला जीव

 

Trending Now