प्रिन्स चार्ल्स राष्ट्रकूल संघटनेचे नवे प्रमुख!

सहा दशकं नेतृत्व केल्यानंतर ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ यांनी काल राष्ट्रकूल देशाचं प्रमुख पद सोडलं. प्रिन्स चार्ल्स हे आता राष्ट्रकूल संघनेचे नवे प्रमुख असणार आहेत.

Sachin Salve
लंडन, २१ एप्रिल : ब्रिटनचे युवराज प्रिन्स चार्ल्स हे राष्ट्रकूल देशांच्या संघनेचे नवे प्रमुख असणार आहेत. महाराणी एलिझाबेथ व्दितीय यांनी काल याबाबतची घोषणा केली. खूप वर्ष मी या संघटनेची धूरा सांभाळली. आता वय झाल्यानं प्रिन्स चार्ल्स यांनी यापुढे या संघटनेचं नेतृत्व करावं अशी आपली इच्छा असल्याची एलिझाबेथ म्हणाल्या आणि सर्व सदस्या राष्ट्रांनीही त्याला पाठिंबा दिला. राष्ट्रकुल संघटनेच्या कारकिर्दीतलं एक मोठं पर्व संपून नव्या प्रवासाची ही सुरुवात मानली जातेय.जागतिक राजकारणात राष्ट्रकूल संघटना म्हणजेच ‘चोगम’चा फारसा प्रभाव नसला तरी आर्थिक दृष्ट्या या संघटनेचं महत्व आहे. त्याचबरोबर ब्रिटनच्या दृष्टीनेही राजघराण्याकडे या संघटनेचं प्रमुखपद असणं मानाचं समजलं जातं. ज्या देशांवर पूर्वी ब्रिटिशांची सत्ता होती असे ५४ देश या संघटनेचे सदस्य आहेत. ब्रेग्झिटनंतर ब्रिटनला या संघटनेचा जास्त उपयोग होणार आहे. ‘राष्ट्रकूल’ संघटनेचं महत्व!

राष्ट्रकूलचे ५४ देश सदस्य आहेतलोकशाही माननाऱ्या आणि राष्ट्रकूलची मुल्य मानणाऱ्यांनाच सदस्यत्वआशिया आणि आफ्रिका खंडातली विकसनशील देशांचा समावेशजगाच्या लोकसंख्येच्या ६० टक्के लोकसंख्या राषट्रकूलची आहेकॉमनवेल्थ देशांमध्ये ७०० अब्ज डॉलर्सचा व्यापारभारत या संघटनेमधला महत्वाचा सदस्य देश आहे. गेली १० वर्ष भारताचे पंतप्रधान राष्ट्रकूलच्या बैठकांना हजर राहत नसल्यानं यावेळी ब्रिटनने पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहावे यासाठी बरेच प्रयत्न केले होते.राष्ट्रकूलनंतर जगात अनेक संघटनांची निर्मिती झाली. राष्ट्रकूलचे सदस्यही त्या संघटांमध्ये सक्रिय आहेत. त्यामुळे राष्ट्रकूलचं महत्व हळू हळू कमी झालंय. मात्र या संघटनेमध्ये सर्वात जास्त विकसनशील देश असल्यानं व्यापाराच्या प्रचंड संधी आहेत. या देशांमध्ये असलेली प्रचंड मोठी बाजारपेठ आणि युवा वर्ग हा सर्व जगाला आकृष्ट करत असतो. त्यामुळे ब्रेग्झिट नंतर होणारं नुकसान भरून काढण्यासाठी ब्रिटन राष्ट्रकूलचा वापर करून घेणार आहे. यात भारतालाही मोठी आर्थिक फायदा घेण्याची संधी आहे.

Trending Now