अटकेतल्या तीन अमेरिकन नागरिकांची उत्तर कोरियानं केली सुटका!

अटकेत असलेल्या अमेरिकेच्या तीन नागरिकांची आज उत्तर कोरियानं सुटका केली. अमेरिका आणि उत्तर कोरियातला वैरभाव कमी होण्याच्या दृष्टीनं ही घटना महत्वाची मानली जाते.

Ajay Kautikwar
वॉशिंग्टन,ता.10 मे: अटकेत असलेल्या अमेरिकेच्या तीन नागरिकांची आज उत्तर कोरियानं सुटका केली. उत्तर कोरियाच्या भेटीवर गेलेले अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माइक पोम्पियो हे स्वत: या तीनही नागरिकांना घेऊन अमेरिकेत येत आहेत. अशी माहिती अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विटरवरून दिली होती.त्यानंतर एंड्रयूज एयर फोर्स तळावर स्वत:जावून त्यांनी अमेरिकेच्या तीन नागरिकांचं स्वागत केलं. अमेरिका आणि उत्तर कोरियातला वैरभाव कमी होण्याच्या दृष्टीनं ही घटना महत्वाची मानली जाते. किम हक-सोंग, टोनी किम आणि किम डोंग-चुल अशी या अमेरिक नागरिकांची नावं आहेत.

 

Trending Now