नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या नेपाळ दौऱ्यावर, अयोध्या-जनकपुर बस सेवेचं करणार उद्घाटन

पंतप्रधान नरेंद्र मोदी नेपाळ दौऱ्यासाठी रवाना झाले आहेत. चार वर्षांत ते तिसऱ्यांदा नेपाळला गेले आहेत.

Renuka Dhaybar
11 मे : पंतप्रधान नरेंद्र मोदी नेपाळ दौऱ्यासाठी रवाना झाले आहेत. चार वर्षांत ते तिसऱ्यांदा नेपाळला गेले आहेत. जनकपूरच्या एअरपोर्टहून ते थेट जानकी मंदिरात जाणार आहेत. इथे ते साधारण पाऊण तास पूजादेखील करतील. मोदी जनकपूरमध्ये असेपर्यंत एकाही विमानाला उड्डाण करण्याची परवानगी देण्यात आलेली नाही.यानंतर नरेंद्र मोदी आणि नेपाळचे पंतप्रधान केपी ओली एकित्रित रामायण सर्किटचं उद्घाटन करतील. या दौऱ्यात पंतप्रधानअयोध्या-जनकपुर बस सेवेचा शुभारंभ करणार आहेत.

पाहूयात मोदींचा आजचा कार्यक्रम कसा असणार आहे ते...- स. 10:00 - जनकपूर येथे आगमन- स. 10:20 जानकी मंदिराला भेट, रामायणा सर्किट आणि जनकपूर-अयोध्या बसचं उद्घाटन- स. 11:10 - बाराबिघामध्ये भाषण- दु. 12:10 - जनकपूरहून प्रस्थान- सं. 6:30 - मोदी आणि नेपाळचे पीएम ओली यांच्यात बैठक 

Trending Now