पुन्हा एकदा पाकिस्तानच्या 'चांद नवाब' यांचा व्हिडिओ झाला व्हायरल!

पाकिस्तानचे चांद नवाब हे रिपोर्टर आठवतायत ना? गेल्या वर्षी ईदच्या सुमारास त्यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. आणि आता दुसरा व्हिडिओ व्हायरल झालाय. यावेळचा तो व्हिडिओ आहे कराचीच्या पानाचा.

Sonali Deshpande
कराची, 29 जून : पाकिस्तानचे चांद नवाब हे रिपोर्टर आठवतायत ना? गेल्या वर्षी ईदच्या सुमारास त्यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. आणि आता दुसरा व्हिडिओ व्हायरल झालाय. यावेळचा तो व्हिडिओ आहे कराचीच्या पानाचा.

हे चांद महाशय यावेळी उभे आहेत एका प्रसिद्ध पानांच्या दुकानात. आणि त्यांना त्या पानाची महती सांगायचीय. पण ते एकसारखं विसरतायत. गोंधळतायत. मध्येच दुकानातल्या विक्रेत्यांना सांगतायत, मी चॅनेलचं नाव घेतलं की मला पान द्या.  आता इथे तर कसली गर्दीही नाही. त्यांना कुणी धक्केही देत नाही. तरीही ते अडखळतायत. पान आधी खावं की नंतर हाही संभ्रम त्यांना आहे. हा व्हिडिओ व्हायरल झालाय.गेल्या वर्षी चांद नवाब रेल्वे स्टेशनवर उभे राहून रिपोर्टिंग करत होते. त्यांचा तो व्हिडिओ इतका व्हायरल झाला की बजरंगी भाईजानमध्ये नवाजुद्दीननं त्यांचीच स्टाइल उचलली होती.हेही वाचाVIDEO : कांदिवलीत नववीतल्या मुलीची आत्महत्या, आठव्या मजल्यावरून मारली उडीघाटकोपर विमान अपघातात मृत्यू झालेल्या मारिया देशातल्या पहिल्या मुस्लिम महिला वैमानिक

सख्खा भाऊ झाला पक्का वैरी, मोठ्या भावानं संपवलं लहान भावाचं कुटुंब

VIDEO : पुण्यातील पीव्हीआर मप्लिफ्लेक्समध्ये मनसेची कर्मचाऱ्याला मारहाण

Trending Now