पाकिस्तानात कार्यक्रमादरम्यान गरोदर गायिकेवर गोळीबार! व्हिडिओ व्हायरल

पाकिस्तानमधल्या एका कार्यक्रमात एका महिला गायिकेला गोळी मारून तिची हत्या केली गेली आहे. ही महिला 6 महिन्यांची गरोदर असल्याचं सांगण्यात येत आहे.

Renuka Dhaybar
12 एप्रिल : सध्या इंटरनेटवर एक भयानक व्हिडिओ वेगाने व्हायरल होताना दिसत आहे तो म्हणजे पाकिस्तानमधल्या एका कार्यक्रमात एका महिला गायिकेला गोळी मारून तिची हत्या केली गेली आहे. ही महिला 6 महिन्यांची गरोदर असल्याचं सांगण्यात येत आहे.हा व्हिडिओ पाकिस्तानच्या सिंध प्रांतातला आहे. या व्हिडिओत एक महिला कार्यक्रमात परफॉर्मन्स करत असताना दिसत आहे. 24 वर्षांची गायिका समीना सिंधु स्टेजवर गाणं गात असतानाच तिच्यावर गोळी झाडण्यात आली.सुत्र्यांच्या माहितीनुसार, तारीक अहमद जटोईने समीनाला गाणं गाण्यासाठी सांगितलं होतं. पण गरोदर असल्या कारणाने मी परफॉर्मन्स देऊ शकत नाही असं तिने सांगितलं. याच मुद्द्यावरून त्यांच्या मोठा वाद झाला आणि दारूच्या नशेत तारीकने समीनाला गोळी घातली.

पण या व्हिडिओमध्ये गोळी घातली त्या दरम्यान समीना स्टेजवर गाणं गात होती. त्यामुळे नक्की कोणत्या वादातून गोळी घालण्यात आली हे अद्याप स्पष्ट नाही आहे.

Trending Now