पाकिस्तानच्या लष्करप्रमुखांचा सूर नरमला, चर्चेनं सुटू शकतो काश्मिरचा प्रश्न!

पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल कमर जावेद बाजवा यांचे सूर नरमले आहेत. काश्मीरसहीत भारतासोबतचे सर्वच प्रश्न चर्चेच्या मार्गानं सुटू शकतात असं बाजवा यांनी स्पष्ट केलं.

Ajay Kautikwar
इस्लामाबाद,ता.15 एप्रिल: कायम चिथावणीखोर वक्तव्यासाठी प्रसिद्ध असणारे पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल कमर जावेद बाजवा यांचे सूर नरमले आहेत. काश्मीरसहीत भारतासोबतचे सर्वच प्रश्न चर्चेच्या मार्गानं सुटू शकतात असं बाजवा यांनी स्पष्ट केलं.पाकिस्तानी मिलीटरी अकादमीच्या पासिंग आऊट परेडदरम्यान विद्यार्थ्यांसमोर ते बोलत होते. प्रश्न सोडवण्यासाठी शांततेचा मार्ग हा सर्वोत्तम आहे. शांततेच्या मार्गानं जाणं म्हणजे आमचा कमकूवतपणा समजला जावू नये असंही त्यांनी स्पष्ट केलं.शांततेची भाषा बोलत असताना त्यांनी काश्मिरच्या स्वयंनिर्णयाच्या अधिकाराचीही पाठराखण केली. शांततेसाठी चर्चा आवश्यक असली तरी ती फक्त देशाचा स्वाभिमान, सार्वभौमता आणि अखंडतेला लक्षात घेऊन केली जाईल असंही बावजा यांनी स्पष्ट केलं.

 

Trending Now