पाकिस्तानात 'जीओ' वर लष्कराची अघोषित बंदी!

पाकिस्तानात लष्करानं प्रभावशाली असणाऱ्या जीओ चॅनलचं प्रसारण बंद पाडलंय. लष्कराची ही अघोषित बंदी लोकशाहीची मुस्कटदाबी असल्याचा आरोप मानवाधिकार संघटनांनी केलाय.

Ajay Kautikwar
इस्लामाबाद,ता.13 एप्रिल: पाकिस्तानात लष्करानं प्रभावशाली असणाऱ्या जीओ चॅनलचं प्रसारण बंद पाडलंय. लष्कराची ही अघोषित बंदी लोकशाहीची मुस्कटदाबी असल्याचा आरोप मानवाधिकार संघटनांनी केलाय.पाकिस्तानातलं शक्तिशाली प्रसारमाध्यम असणाऱ्या जीओ चॅनल वर लष्करानं सध्या अघोषित बंदी घातलीय. त्यामुळं लष्कराची प्रसारमाध्यमांविरूध्दची ही मुस्कटदाबी असल्याचा आरोप होतोय. या प्रकरणावरून पाकिस्तानात सध्या दोन गट पडले आहेत. एक गट लष्कराचं कडवं समर्थन करतोय...तर दुसरा गट लोकशाही आणि प्रसारमाध्यमांचा समर्थक आहे.जीओ हे चॅनल पाकिस्तानमधल्या 'जंग' या माध्यमसुमहाचं चॅनल आहे. एकेकाळी हा समुह लष्कर समर्थक समजला जात असे. गेल्या काही वर्षांमध्ये जीओ नं लष्करातला गैरव्यवहार आणि लोकशाही सरकारमधला त्यांचा हस्तक्षेप यावर मोहिमच सुरू केली होती.

याविरूद्ध लष्करानं जीओ आणि जंग समुहाला अनेकदा इशाराही दिला होता. मात्र लष्कराच्या दबावाला बळी न पडण्याचा निर्णय घेतल्यानं जीओवर अघोषित बंदी घालण्यात आल्याचं बोललं जातंय.पाकिस्तानातल्या सर्वच भागात जीओ पाहिल्या जाते..मात्र गेल्या 15 दिवसांपासून हे चॅनल दिसणं बंद झालं. सुरवातिला केबलवरून आणि नंतर इतर माध्यमांमधून जीओ दिसेनासं झाल्यानं लोकांनी तक्रार करायला सुरूवात केली. मात्र या तक्रारींसाठी कुणाकडेही उत्तर नव्हतं.जीओनंही आपल्या ट्विटर हॅण्डलवरून लोकांना तक्रार करण्याचं आवाहन केलंय. चॅनल दिसत नसेल तर लोकांन संपर्क साधावा असं म्हटलं आहे. तर अशी कुठलीही बंदी आम्ही घातली नाही असं स्पष्टीकरण पाकिस्तानातल्या माध्यमांशी संबंधीत संघटनांनी केलंय. मात्र असं असलं तरी हा विरोधातला आवाज दडपण्याचाच प्रकार असल्याचा आरोप मानवाधिकार संघटनांनी केलाय.

Trending Now