यापुढे आण्विक क्षेपणास्त्रांची चाचणी करणार नाही, उत्तर कोरियाची महत्त्वाची घोषणा

सतत अण्वस्त्र हल्ल्याची धमकी देणारे उत्तर कोरीयाचा हुकुमशाह किम जाँग उन यांनी यापुढे कोणतीही आण्विक चाचणी करणार नसल्याचे जाहीर केलंय. यामुळे आशिया देशांमध्ये असलेला तणाव काहीसा कमी होण्यास मदत होईल.

Sonali Deshpande
21 एप्रिल : सतत अण्वस्त्र हल्ल्याची धमकी देणारे उत्तर कोरीयाचा हुकुमशाह किम जाँग उन यांनी यापुढे कोणतीही आण्विक चाचणी करणार नसल्याचे जाहीर केलंय. यामुळे आशिया देशांमध्ये असलेला तणाव काहीसा कमी होण्यास मदत होईल. या निर्णयाचे स्वागत अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष डोनाल्ड ट्रॅम्प यांनी केलंय. मात्र दक्षिण कोरियाने घेतलेल्या निर्णयाने आम्ही समाधानी नसल्याचे जपानकडून सांगण्यात येत आहे.किम जाँग उन यांनी हा निर्णय देशहितासाठी घेतल्याचे बोलले जात आहे. देशाची अर्थव्यवस्था आणि राष्ट्रीय मुद्यांवर लक्ष्य केंद्रीत करण्याच्या उद्देशानं किम जाँग उन यांनी निर्णय घेतल्याचे म्हटले जात आहे. किम जाँग उन यांनी घेतलेला हा निर्णय अतिशय महत्त्वपूर्ण पाऊल मानले जात आहे.दरम्यान, दक्षिण कोरिया आणि उत्तर कोरिया या दोन्ही देशांचे राष्ट्राध्यक्ष पुढील आठवड्यात पॅन्मुन्जोम इथे भेटणार आहेत. या भेटीपूर्वीच किम जाॅंग उन यांनी हा निर्णय घेतला आहे.

Trending Now