JOIN US
मराठी बातम्या / विदेश / पाकिस्तान रचतोय हल्ल्याचा नवा डाव, दहशतवाद्यांकडून ड्रोन हल्ल्याची शक्यता

पाकिस्तान रचतोय हल्ल्याचा नवा डाव, दहशतवाद्यांकडून ड्रोन हल्ल्याची शक्यता

हे ड्रोन उडाल्यानंतर त्याचा जमीनीशी संपर्क तुटतो आणि ते आपल्या ठरवलेल्या टार्गेटला हीट करते. त्यामुळे या ड्रोनचा धोका जास्त आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली 10 जानेवारी : काश्मीरमधलं कलम 370 हटवल्यानंतर पकिस्तानचा जळफळाट झालाय. तो अजुनही शांत झालेला नाही. पाकिस्तानचे लष्करी अधिकारी दहशतवाद्यांना हाताशी धरून भारतात दहशतवादी हल्ल्यांच्या तयारीत असल्याची माहिती गुप्तचर सूत्रांनी दिलीय. यासाठी खास ड्रोनही तयार करण्यात येत असून त्या माध्यमातून जम्मू आणि काश्मीरमध्ये ड्रोन हल्ले करण्याची पाकिस्तानची तयारी आहे. सर्जिकल स्ट्राईक आणि बालाकोटचा हल्ला या दोन वेळी भारताने पाकिस्तानला दणका दिला. मात्र पाकिस्तानच्या प्रवृत्तीत काहीच बदल होत नाहीये. भारतविरोधी करावाया सुरूच ठेवण्यासाठी पाक लष्करी अधिकारी नवे नवे डाव खेळण्याच्या तयारीत असल्याचं पुढे आलंय. अशा हल्ल्यांसाठी पाकिस्तानी लष्कर एका खास प्रकारचे ड्रोन्स विकसित करत आहेत. हे ड्रोन रेडियो फ्रीक्वेंसी किंवा जीपीएस (GPS) असलेले नाहीत. तर ते प्री लोडेड प्रोग्राम असणारे आहेत. म्हणजेच त्यामध्ये अचूक पद्धतीने टार्गेट फिड करण्यात येतं. हे ड्रोन उडाल्यानंतर त्याचा जमीनीशी संपर्क तुटतो आणि ते आपल्या ठरवलेल्या टार्गेटला हीट करते. त्यामुळे या ड्रोनचा धोका जास्त असल्याचं बोललं जातंय. आईने तान्हुलीला रस्त्यावर टाकलं, मात्र वर्दीतल्या मातेनं ह्रदयाशी कवटाळलं भारताच्या दबावामुळे दहशतवाद्यांनी आपली रणनीती बदलली असून आता मोठ्या लाँच पॅड ऐवजी ते फक्त दोन किंवा तीनच्या गटांमध्ये एकत्र येतात. भारतीय सुरक्षा दलाला चकवा देण्यासाठी ही व्युव्हरचना असल्याचं बोललं जातंय.

सुलेमानीला ठार केल्यामुळे शांततेचं ‘नोबेल’ मलाच द्या - डोनाल्ड ट्रम्प

जम्मू आणि काश्मीरमध्ये सध्या हिमवर्षाव सुरू असल्याने घुसखोरीला आळा बसलाय. हिमवर्षावामुळे दहशतवाद्यांना भारतीय सीमेतून आत घुसणं शक्य होतं नाही. त्यामुळे बर्फ वितळण्याची दहशतवादी हे वाट पाहात आहेत. तर बदलत्या राजकीय पार्श्वभूमीवर सुरक्षा दलांनी जास्त काळजी घेतली असून अतिरेक्यांना रोखण्यासाठी वेगळ्या पद्धतीच्या उपाययोजनाही करण्यात येत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या