पनामाचा दणका, निवडणूक लढवण्यास नवाज शरीफ यांच्यावर आजन्म बंदी!

पनामा पेपर्स प्रकरणात पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांना सुप्रीम कोर्टानं दणका दिलाय. या प्रकरणात दोषी आढळल्यानं शरीफ यांना निवडणूक लढण्यास आजन्म बंदी घालण्यात आलीय.

Ajay Kautikwar
इस्लामाबाद,ता.13 एप्रिल: पनामा पेपर्स प्रकरणात पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांना सुप्रीम कोर्टानं दणका दिलाय. या प्रकरणात दोषी आढळल्यानं शरीफ यांना निवडणूक लढण्यास आजन्म बंदी घालण्यात आलीय. त्यामुळं शरीफ यांना यापुढं कुठलंही सरकारी पद स्विकारता येणार नाही.या निर्णयामुळं पाकिस्तानच्या राजकारणा मोठे बदल होण्याची शक्यता आहे. हे प्रकरण उजेडात आल्यानंतर जुलै 2017 मध्ये नवा जशरीफ यांना पंतप्रधानपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर हे प्रकरण सुप्रीम कोर्टात गेलं होतं. पाच न्यायाधिशांच्या खंडपीठानं एकमतानं हा निर्णय दिलाय. शरीफ यांना निवडणूक लढण्यास बंदी करावी अशा पाच याचिका सुप्रीम कोर्टात दाखल झाल्या होत्या.

Trending Now