पंतप्रधान उद्या ऐतिहासिक 'वेस्टमिन्स्टर हॉल'मध्ये करणार भाषण!

पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी लंडनमधल्या ऐतिहासिक 'वेस्टमिन्स्टर हॉल'मध्ये भाषण करणार आहेत. ‘भारत की बात, सबके साथ’ असं कार्यक्रमाचं नाव असून जगभरातल्या भारतियांच्या प्रश्नांना ते उत्तरं देणार आहेत.

Ajay Kautikwar
लंडन,ता.17 एप्रिल: पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी लंडनमधल्या ऐतिहासिक 'वेस्टमिन्स्टर हॉल'मध्ये भाषण करणार आहेत. ‘भारत की बात, सबके साथ’ असं कार्यक्रमाचं नाव असून जगभरातल्या भारतियांच्या प्रश्नांना ते उत्तरं देणार आहेत.युरोपीयन इंडिया फोरमनं हा कार्यक्रम आयोजित केलाय. या आधी 1931 मध्ये महात्मा गांधींनी या हॉलमध्ये भाषण केलं होतं. त्यानंतर पहिल्यांदाच एखाद्या भारतीय नेत्याला या ऐतिहासिक हॉलमध्ये भाषण करण्याची संधी मिळतेय.राष्ट्रकूल परिषदेला उपस्थित राहण्यासाठी मोदी ब्रिटनच्या भेटीवर आहेत. ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ या राष्ट्रकूल संघटनेच्या प्रमुख असून त्यांचं वय 90 च्या पुढे गेल्यामुळं त्या हे पद सोडण्याची शक्यता आहे.

 

Trending Now