क्युबामध्ये विमान कोसळलं, 100 जणांचा मृत्यू

Sachin Salve | News18 Lokmat
19 मे : क्युबामध्ये बोईंग 737 प्रवाशी जेट विमान कोसळल्याची घटना घडलीये. या अपघातात 100 हून अधिक प्रवाशांचा मृत्यू झाल्याचं वृत्त समोर येतंय.हवानाच्या मुख्य विमानतळावरुन उड्डाण केल्यानंतर काही क्षणातंच हे विमान कोसळलं. हवाना विमानतळावरील कर्मचाऱ्यांनी या वृत्ताला दुजोरा दिलाय.अपघातग्रस्त विमान हे डोमेस्टिक विमान होते. ते हवाना इथून होलगुइनकडे निघाले होते. या विमानातून 104 प्रवासी प्रवास करीत होते.

Trending Now