मिस अमेरिका स्पर्धेतून बिकिनी होणार हद्दपार !

सध्या बोलबाला आहे तो 'मिस अमेरिका' या स्पर्धेचा. कारण या स्पर्धेचे काही नियम बदलण्यात आले आहेत.

Renuka Dhaybar
अमेरिका, 07 जून : सध्या बोलबाला आहे तो 'मिस अमेरिका' या स्पर्धेचा. कारण या स्पर्धेचे काही नियम बदलण्यात आले आहेत. या स्पर्धेमध्ये बिकिनी घालून असलेली फेरी रद्द करण्यात आली आहे. त्याचबरोबर भौतिकशास्त्रावर आधारित फेरीदेखील रद्द करण्यात आली आहे. या स्पर्धेच्या आयोजकांकडून हा निर्णय जाहीर करण्यात आला आहे.ही स्पर्धा शारीरिकदृष्ट्या घेतली जाणार नाही त्यामुळे या स्पर्धेतून स्विमिंग स्पर्धादेखील रद्द करण्यात आली आहे. अनेकदा काही स्त्रीयांना स्पर्धेत भाग तर घ्यायचा असतो पण हाय हिल्स आणि बिकिनी घालायची नसते. बिकीनी राऊण्डमध्ये अवघडल्यासारखं होत असल्याची होत होती तक्रार वारंवार स्पर्धकांकडून केली जात होती. त्यामुळे याच मुद्द्याला लक्षात घेत हा निर्णय घेण्यात आला आहे.'मिस अमेरिका ही एक स्पर्धा आहे ज्याच्यामध्ये स्पर्धकांची बुद्धिमता तपासली जाते त्यात त्यांचं शारीरिक प्रदर्शन नको' असं मिस अमेरिका स्पर्धेच्या आयोजक ग्रेचन कार्लसन यांनी म्हटलं आहे.

97 वर्षांआधी सुरू झालेल्या या नियमांना मोडून मिस अमेरिका या स्पर्धेतून बिकिनी, भौतिकशास्त्र आणि स्विमिंग अशा फेऱ्या काढून टाकण्यात आल्या आहेत.

Trending Now