फ्रान्समध्ये या 'स्पायडरमॅन'नं वाचवला 4 वर्षांच्या मुलाचा जीव!

ममुदू गसामा हा तरुण अक्षरशः स्पायडरमॅनसारखा तळ मजल्यावरून चौथ्या मजल्यावर गेला, आणि त्यानं मुलाचे प्राण वाचवले.

Sonali Deshpande
पॅरिस, 29 मे : फ्रान्समधला एक व्हिडिओ सध्या जगभर गाजतोय. माली देशातल्या एका नागरिकानं पॅरिसमध्ये ४ वर्षांच्या मुलाचा जीव वाचवला. इमारतीच्या बाल्कनीमधून हा छोटा मुलगा लटकत होता. त्याचा जीव धोक्यात होता. पण ममुदू गसामा हा तरुण अक्षरशः स्पायडरमॅनसारखा तळ मजल्यावरून चौथ्या मजल्यावर गेला, आणि त्यानं मुलाचे प्राण वाचवले.

फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन यांनी या तरुणाला बोलावून घेतलं, आणि त्याला फ्रान्सचं नागरिकत्व आणि अग्निशमन दलात नोकरीची ऑफर दिली. ममुदू हा फ्रान्समध्ये कामगार म्हणून आला.अतिशय हलाखीच्या परिस्थितीत तो राहतो. सरकारनं दिलेल्या संक्रमण शिबिरात त्याचं घर आहे. त्याला ओळखणाऱ्या सर्वांनाच त्याचा अभिमान वाटतोय.

मालीमधला एक नागरिक फ्रेंच मुलाला वाचवतो. अशा कृतीमुळेच मानवता एकत्र येते, माणसं जवळ येतात. तो लहान मुलगा मोठेपणी काय बनेल, काय काम करेल माहीत नाही. पण ममुदूनं त्याला वाचवलं, हे सर्वात महत्त्वाचं, अशी भावना त्याच्यासोबत राहणाऱ्या एका काकांनी बोलून दाखवली.

Trending Now