कसे आहेत 92 वर्षांचे मलेशियाचे पंतप्रधान?

महाधीर यांचा जन्म १० जुलै १९२५चा. त्यांना ८ भावंडं, हे सर्वात धाकटे. शिक्षणासाठी ते सिंगापूरला गेले आणि डॉक्टर झाले.

Sonali Deshpande
अमेय चुंभळे, मलेशिया,12 मे : वय हा केवळ एक आकडा आहे, अशा आशयाची एक म्हण आहे इंग्रजीत. मलेशियामध्ये याचा नुकताच प्रत्यय आला. ९२ वर्षांचे महाधीर मोहम्मद यांनी मलेशियाच्या पंतप्रधानपदाची शपथ घेतली.बघून विश्वास बसत नाही पण या नेत्याचं वय आहे ९२. महाधीर मोहम्मद असं त्यांचं नाव. नुकतीच त्यांनी मलेशियाच्या पंतप्रधानपदाची पुन्हा शपथ घेतली. याआधी १९८१ ते २००३, म्हणजे २२ वर्षं ते पंतप्रधानपदावर होते.महाधीर यांचा जन्म १० जुलै १९२५चा. त्यांना ८ भावंडं, हे सर्वात धाकटे. शिक्षणासाठी ते सिंगापूरला गेले आणि डॉक्टर झाले. प्रॅक्टिस चांगली चालली होती, त्यातून आलेल्या पैशातून स्वतःचे अनेक व्यवसाय सुरू केले. 1956 मध्ये सिती हस्मा अली यांच्याशी त्यांनी लग्न केलं. कालांतरानं ते राजकारणात आले.. आणि १९८१ साली त्यांनी पंतप्रधानपदाची शपथ घेतली.

सर्वांना वाटलं, आता महाधीर यांची कारकीर्द संपली. तेही राजकारणातून निवृत्त झाले, आणि आपल्या व्यवसायांमध्ये व्यस्त झाले. पण २०१५ साली परिस्थिती बदलली. पंतप्रधान रझाक यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप झाले, आणि अर्थव्यवस्था हेलकावे खाऊ लागली. शेवटी महाधीर यांनी २०१७मध्ये, वयाच्या ९१व्या वर्षी आपला पक्ष काढला, प्रचार करू लागले. याआधी त्यांच्यावर २ बायपास सर्जरी झाल्या आहेत. पण त्यांना फिकीर नाही. निश्चय केला की तो पूर्ण करायचाच, हा त्यांचा स्वभाव. म्हणूनच, आज ते जगातले सर्वात वयस्कर अध्यक्ष बनलेत.रोज लागणाऱ्या गोष्टी स्वस्त होतील, आणि अर्थव्यवस्था रुळावर येईल, यासाठी मलेशियन जनता त्यांच्याकडे डोळे लावून बसलीये. नाहीतरी, देश चालवायचा म्हटलं की अनुभव लागतो, हे तरुणांचं काम नाही, असं खुद्द महाधीर यांचं मत. त्यामुळे देशाला पूर्वपदावर आणण्यात ते कोणतीही कसूर ठेवणार नाहीत, यात काहीच शंका नाही. ब्युरो रिपोर्टसह , न्यूज१८ लोकमत.महाधीर मोहम्मद यांची कारकीर्द- जन्म - 10 जुलै 1925- ८ भावंडं, महाधीर सर्वात धाकटे- शिक्षणासाठी सिंगापूरला स्थलांतर- डॉक्टरकीचं शिक्षण पूर्ण- प्रॅक्टिससोबत अनेक व्यवसाय सुरू केले- तरुण वयात राजकारणात प्रवेश- 1981 - पहिल्यांदा पंतप्रधान

Trending Now