पाहाल ते नवलच... जेव्हा सिंहीणी फोटोग्राफर होते

वाईल्ड लाइफ फोटोग्राफी करण्याची आवड तर अनेकांना असते. मात्र आतापर्यंत कोणत्या सिंहीणला फोटो कोढताना तुम्ही कधी पाहिले आहे का? सीजीटीएनच्या ट्विटर अकाऊंटवर अशाच एका सिंहीणीचे फोटो शेअर करण्यात आले आहेत. सीजीटीएनच्या ऑफीशियल ट्विटर अकाऊंटवर एका सिंहीणीने तोंडात कॅमेरा पकडल्याचे दिसते. हा फोटो पाहून असं वाटतंय की सिंहीणीला बहुधा आपल्या तीन बछड्यांचा खेळतानाचा फोटो काढायचा आहे. सिंहीण पुढे त्या कॅमेऱ्याचं काय करते हे पाहून तुम्हाला धक्काच बसेल.

कॅमेरा तोंडात पकडल्यानंतर काही वेळाने त्या सिंहीणीने तो कॅमेरा आपल्या बछड्यांना खेळायला दिला. त्या बछड्यांनांही खेळायला एक नवी गोष्ट मिळाल्याने ते त्या कॅमेरासोबत मनोसोक्त खेळत होते.

Trending Now