नीरव मोदी, माल्ल्याला भारतात आणण्यात यशस्वी होणार का या महिला अधिकारी?

विजय माल्ल्या, नीरव मोदी अशा भारताला हव्या असणाऱ्या आर्थिक गुन्हेगारांना देशात आणण्याची जबाबदारी आता रुची घनश्याम या महिला अधिकाऱ्यावर असणार आहे.

मुंबई, 4 सप्टेंबर : विजय माल्ल्या, नीरव मोदी अशा भारताला हव्या असणाऱ्या आर्थिक गुन्हेगारांना देशात आणण्याची जबाबदारी आता एका महिला अधिकाऱ्यावर असणार आहे.आर्थिक घोटाळा करून आणि कर्ज चुकवून ब्रिटनला पळून गेलेल्या उद्योजकांना भारतात परत आणण्यासाठी ब्रिटनमधील उच्चायुक्त पातळीवरचा अधिकारी महत्तपूर्ण भूमिका बजावू शकतो. या जागेवर नुकतीच रुची घनश्याम यांची निवड झाली आहे.विजयालक्ष्मी पंडित यांच्यानंतर ब्रिटनमधल्या भारताच्या अँबॅसीडर म्हणून निवड झालेल्या या दुसऱ्याच महिला अधिकारी आहेत. पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, घाना या देशांमध्ये नेमणुकीवर असताना त्यांनी वैशिष्ट्यपूर्ण कामगिरी केलेली आहे.

ब्रिटनधल्या भारतीय उच्चायुक्त म्हणून रुची घनश्याम यांची नियुक्ती झाली आहे. ब्रिटनस्थित 15 लाख भारतीयांसाठी ही नेमणूक महत्त्वाची असते. कॉमनवेल्थमधल्या देशांच्या नेत्यांची एक मोठी परिषद लंडनमध्ये नुकतीच झाली होती. त्या परिषदेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समवेत रुची ब्रिटन दौऱ्यावर होत्या.सायकॉलॉजीमध्ये उच्चशिक्षण घेतलेल्या रुची घनश्याम या 1982च्या बॅचच्या आयएफएस अधिकारी आहेत. त्यांचे पती ए आर घनश्याम सुद्धा आयएफएस अधिकारीच आहेत.

पाकिस्तानच्या 'या' खेळाडूने यो यो टेस्टमध्ये विराट कोहलीला टाकले मागे

बाळासाहेब ठाकरेंचं स्मारक मेअर बंगल्यात नाही, तर बंगल्याच्या तळघरात होणार

Trending Now