शंकराच्या रूपात इम्रान खान, पाकिस्तानच्या संसदेत 'तांडव'

भगवान शंकराच्या रूपात असलेल्या इम्रान खानचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालाय. यावरून पाकिस्तानात वादळ निर्माण झालंय.

Ajay Kautikwar
इस्लामाबाद,ता.12 एप्रिल : पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू आणि पाकिस्तान तहरीक-ए-इसांफ (पीटीआय) या पक्षाचा नेता इम्रान खान सध्या वादात सापडलाय. भगवान शंकराच्या रूपात असलेल्या इम्रान खानचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालाय. यावरून पाकिस्तानात वादळ निर्माण झालंय.नवाज शरीप यांच्या पाकिस्तान पीपल्स पार्टीचे नेते रमेश लाल यांनी यावर आक्षेप घेतला असून हा हिंदूंचा अपमान असल्याचं म्हटलंय. तर हे कृत्य काही हितशत्रूंनीच केल्याचा आरोप पीटीआयच्या नेत्यांनी केलाय. हे प्रकरण एवढ्यावरच न थांबता पाकिस्तानच्या संसदेत गेलं. या प्रकरणाची गृहमंत्रालयाकडून चौकशी करण्यात यावी असा आदेश संसदेच्या अध्यक्षांनी दिला.

Trending Now