इम्रान खानचं लग्न मोडलं? कुत्र्यामुळं तिसरी बायको गेली सोडून

इम्रान खानचा पाळीव कुत्रा आवडच नसल्याने त्यांची तिसरी बुशेरा मानेका त्यांना सोडून गेलीय.

Ajay Kautikwar
इस्लामाबाद,ता.25 एप्रिल: पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू आणि पाकिस्तान तेहेरिक ए इन्साफ या पक्षाचे संस्थापक इम्रान खान यांचं लग्न धोक्यात आल्याची बातमी आहे. आणि त्याचं कारण आहे इम्रान खानचा पाळीव कुत्रा.इम्रान खान आणि बुशेरा मानेका यांचं फेब्रुवारी महिन्यात लग्न झालं होतं. बुशेरा या इम्रानकडे राहायला आल्या मात्र त्यांना इम्रानचा पाळीव कुत्रा आवडला नाही. त्यामुळं त्या कुत्र्याला दुसरीकडे हलवण्यात आलं होतं. मात्र काही दिवसांनी तो कुत्रा पुन्हा आपल्या मालकाकडे म्हणजेच इम्रानकडे परत आला.कुत्रा इम्रानचा लाडका असल्यानं त्याचा सर्व घरात संचार होता मात्र हेच बुशेरांना आवडलं नाही. या कुत्र्यामुळं दररोजच्या धार्मिक गोष्टींमध्ये अडथळा येत असल्याचं कारण देत बुशेरा या घर सोडून गेल्याची बातमी पाकिस्तानातल्या विविध ऊर्दू वृत्तपत्रांनी दिलीय.

  

Trending Now