...म्हणून पाकिस्तानात वाढत आहेत हिंदू मतदार

जगभरात सर्वात जास्त हिंदू राहणाऱ्या देशांमध्ये सध्या पाकिस्तान पाचव्या स्थानावर आहे

पाकिस्तानात 25 जुलैला सार्वत्रिक निवडणुका आहेत. या निवडणुकांच्याआधी इलेक्शन कमीशन ऑफ पाकिस्तान (ईसीपी) ने मतदारांची मोजणी केली. या मतमोजणीनुसार, गेल्या पाच वर्षांमध्ये पाकिस्तानात असलेल्या गैर मुस्लिमांच्या संख्येत 30 टक्क्यांनी वाढ झाली आहे. यात सर्वाधिक हिंदू मतदार आहेत. हिंदूंच्या मतांमुळे अनेक ठिकाणी सत्ताबदल होऊ शकते याची जाणीव असल्यामुळे पाकिस्तानातील प्रत्येक पक्ष हिंदूंचे मत आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न करत असतो. पाकिस्तानातील संसदेत 10 जागा या अल्पसंख्यांकांसाठी राखीव असतात. त्यातील सहा जागांवर हिंदू नेता निवडून येतात.ईसीपीच्या वेबसाइटवर दिलेल्या आकड्यांनुसार, 2013 मध्ये झालेल्या निवडणुकांवेळी हिंदूंची संख्या 14 लाख होती. तर 2018 मध्ये ही संख्या 17.7 लाख एवढी झाली आहे. पाकिस्तानातील हिंदूंमध्ये 3 लाख 70 हजारांची वाढ झाली आहे. पाकिस्तानात हिंदू अल्पसंख्यांक आहेत. जगभरात सर्वात जास्त हिंदू राहणाऱ्या देशांमध्ये सध्या पाकिस्तान पाचव्या स्थानावर आहे. पण पाकिस्तानात अशाच पद्धतीने हिंदूंची वाढ होत राहिली तर 2050 पर्यंत सर्वाधिक हिंदू असलेल्या देशांमध्ये पाकिस्तान चौथ्या स्थानावर येईल.

हेही वाचाः...तर मुख्यमंत्री, उद्धव ठाकरेंवर एफआयआर करेन - संजय निरुपम'50 लाख लोकसंख्येचा देश वर्ल्ड कप खेळतो आणि आपण हिंदू- मुस्लिम खेळतोय' - हरभजन सिंग

Trending Now