बांग्लादेशमध्ये सरकारी नोकऱ्यांमधील आरक्षण रद्द!

गेले तीन दिवस बाँग्लादेशमध्ये सरकारी नोकऱ्यांमधील आरक्षणाविरूद्ध आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनात 100हून अधिक लोक जखमी झाले आहेत

Chittatosh Khandekar
12एप्रिल: एकीकडे भारतामध्ये सर्वणांनी जातीयवादी आरक्षणाविरोधात बंड पुकारलं असतानाच दुसरीकडे  बाँग्लादेशमध्ये मात्र स्वातंत्र्यसैनिकांच्या मुलांचं आणि अल्पसंख्यांकांचं आरक्षण रद्द करण्यात आलं आहे.  गेले तीन हे आरक्षण रद्द करण्यासाठी मोठ्या प्रमाणात आंदोलनं केली जात होती.गेले तीन दिवस बाँग्लादेशमध्ये सरकारी नोकऱ्यांमधील आरक्षणाविरूद्ध आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनात 100हून अधिक लोक जखमी झाले आहेत. चिट्टागोंग,ढाका ,  या सह 10 विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी हे आंदोलन पुकारलं होतं.  बाँग्लादेशमध्ये  1971च्या स्वातंत्र्यसेैनिकांच्या मुलांना आणि अल्पसंख्यांना तसंच दिव्यांगाना आरक्षण देण्यात येतं. स्वातंत्र्यसैनिकांच्या मुलांचं आरक्षण आता रद्द केलं जाणार आहे. तरी  दिव्यांगांसाठी विशेष सोय केली जाईल. अशी घोषण खुद्द पंतप्रधान शेख हसीलभारतात विविध समाजांची  आरक्षणाची मागणी जोर धरते आहे. तसंच आरक्षण रद्द करण्याच्या मागणीचा सूरही  वाढतो आहे. अशा परिस्थितीत  आता भारतात काय हालचाल होते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Trending Now