फ्लोरिडा येथील रेस्तराँमध्ये गोळीबार; ४ ठार, ११ जण जखमी

अजूनही त्या परिसरातील जनतेमध्ये भितीचे वातावरण असून दुसऱ्या हल्लेखोराचा पोलीस कसून शोध घेत आहेत.

फ्लोरिडा, २७ ऑगस्ट- अमेरिकेतील फ्लोरिडा येथे जॅक्सनविल परिसरात रविवारी झालेल्या गोळीबारात ४ ठार तर ११ लोक गंभीर जखमी झाले आहेत. एका रेस्तराँमध्ये हल्लेखोरांनी लोकांवर बेछूट गोळीबार करायला सुरूवात केली. या गोळीबारात ४ जण जागीच ठार झाले असून ११ जण गंभीर जखमी आहेत. त्यांना जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

Trending Now