जपानमध्ये खरबुजांची किंमत हजारोंच्या घरात!

जपानमध्ये खरबूज कितीला मिळतंय, हे माहीत आहे का ? तिथे खरबूज लक्झरी फळ मानलं जातं. आणि त्याची किंमत आहे चक्क 6 ते 10 हजारापर्यंत.

Sonali Deshpande
जपान, 27 मे : भारतात सध्या खरबूजांचा सिझन आहे. एका किलोग्रामला 40 ते 80 रुपये असा सर्वसाधारण भाव आहे. पण जपानमध्ये खरबूज कितीला मिळतंय, हे माहीत आहे का ? तिथे खरबूज लक्झरी फळ मानलं जातं. आणि त्याची किंमत आहे चक्क 6 ते 10 हजारापर्यंत.जपानमध्ये तशी सगळीच फळं महाग. एकमेकांच्या घरी जाताना भेटवस्तू म्हणून फळं घेऊन जातात. मग फळं एवढी महाग का बरं?जपानमध्ये फळांचा आकार महत्त्वाचा असतो. त्याकडे विशेष लक्ष दिलं जातं. खरबूज पूर्ण गोल असेल तरच ते खाण्यायोग्य मानलं जातं. नाही तर ही फळं फेकून दिली जातात.

खरबूजं सगळीच एका आकाराची नसतात. त्यामुळे अनेक खरबूजं फेकली जातात. त्यामुळे चांगली खरबूजं कमी असल्यानं त्याची किंमत वाढते. अनेकदा त्याची लिलाव होतो. आणि त्याची किंमत लाखाच्या घरात पोचते. त्यामुळे जपानला जात असाल तर खरबुजाकडे सांभाळूनच बघा.

Trending Now