तांत्रिक बिघाडामुळे नासाच्या 'सोलर प्रोब'चं प्रक्षेपण लांबणीवर

शिंगटन, 11 ऑगस्ट : नासाचं सोलर प्रोब यान आज सूर्याकडे झेपावणार होतं. मात्र तांत्रिक बिघाड झाल्यानं या यानाच्या प्रक्षेपणाला विलंब होणार आहे. सूर्याच्या वातावरणाचा अभ्यास करण्यासाठी नासा हे रोबोटिक अंतराळयान पाठविणार आहे. अमेरिकेतील फ्लोरिडा येथील केप केनेरवल येथून हे यान प्रेक्षपित केले जाणार आहे. हे यान सूर्याच्या वातावरणात राहणार असून, त्याची किरणे आणि त्याच्या आतील भागातील उष्णतापमानाचा शोध घेण्यात येणार आहे. नासाची ही महत्वाकांक्षी मोहीम आहे. या मोहिमेचा खर्च 1.5 अब्ज डॉलरएवढा आहे.सूर्य हा सूर्यमालेतील तप्त गोळा. आता या सूर्याजवळ जाण्याचा प्रयत्न अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था नासा करणार आहे. 'पार्कर सोलर प्रोब' हे यान एक छोट्या कारच्या आकाराचे असून, हे यान सूर्याच्या वातावरणात राहून त्याची किरणे आणि सूर्याच्या आतील भागातील (कोरोना) उष्णतामान याचा शोध घेणार आहे. हे यान सूर्याच्या पृष्ठभागापासून ते सूर्याच्या आतील भागापर्यंत ६.१ दशलक्ष किलोमीटर प्रवास करणार आहे.

'सूर्याच्या जवळ पोहेचणारी ही मोहीम खूप कठीण आहे; मात्र ही मोहीम महत्वाकांक्षी आहे', असे जॉन हापकीन्स युनिव्हर्सिटीचे प्रकल्प शास्त्रज्ञ निकोला फॉक्स यांनी सांगितले. सूर्य आणि पृथ्वी यांच्यातील अंतर १५ कोटी किलोमीटर आहे. त्यामुळे इतका लांब पल्ला गाठत हे यान सूर्याजवळ पोचण्याचा प्रयत्न करणार आहे. या मोहिमेचा खर्च १.५ अब्ज डॉलरएवढा आहे.या दिग्गजांनीही बसवले वाहतुकीचे नियम धाब्यावर, दंड भरला नाहीनालासोपारा शस्त्रसाठा प्रकरण - आणखी दोन जण एटीएसच्या ताब्यातमालदीव- भारताचे संबंध बिघडले, हेलिकॉप्टर आणि सैनिक मागे घेण्याची भारताला सूचना 

Trending Now