चीनने बांधला जगातला समुद्रावरचा सर्वात लांब पूल!

यापूर्वी या तीन जागांमधील अंतर पार करण्यासासाठी तीन तास लागत होते. जवळपास 55 किलोमीटर लांबीचा हा पुल हे जगातलं एक आश्चर्य आहे. याशिवाय हा पुल सुरक्षित आहे. भूकंप, वादळ आणि माल वाहतूक करणाऱ्या महाकाय बोटींपासूनही हा पूल सुरक्षित राहू शकतो.

Chittatosh Khandekar
10 मे:  अभियांत्रिकी क्षेत्रातली नवनवीन आश्चर्य प्रत्यक्षात आणणाऱ्या चीनने आता समुद्रावरच्या जगातल्या सर्वात लांब पुल सुरु केलेला आहे.  यामुळे चीन  मकाऊ आणि हॉंग काँगमधलं अंतर आता अर्ध्या तासावर येणार आहे.यापूर्वी  या तीन जागांमधील  अंतर पार करण्यासासाठी तीन तास लागत होते. जवळपास 55 किलोमीटर लांबीचा हा पुल हे जगातलं एक आश्चर्य आहे.   याशिवाय हा पुल सुरक्षित आहे.  भूकंप, वादळ आणि माल वाहतूक करणाऱ्या महाकाय बोटींपासूनही हा पूल सुरक्षित राहू शकतो.  यासाठी 4 लाख टन स्टील वापरण्यात आलं आहे.  सन फ्रान्सिस्कोच्या गोल्डन गेट ब्रीजपेक्षा साडेचार पट अधिक स्टीलसाठी वापरण्यात आलं.  या पुलावर वेगाची मर्यादा 100 किलोमीटर प्रति तास अशी घालण्यात आली आहे.  हा पूल चीनच्या ग्रेटर बे एरियात आहे.  जवळपास 56 हजार 500 चौरस किलोमीटरचा परिसर हा पूल व्यापतो. जवळपास 11 शहरांमधून हा पूल जातो. याशिवाय हॉंगकॉंग - चीन, मकाव - चीन , हॉंगकाम - मकाव अशा सीमांनाही हा पूल स्पर्श करतो.आता भारतात असे पूल कधी बनणार  हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Trending Now