'व्हॅटिकन सिटी'त सुरू होणार 'जादूटोण्या'चे वर्ग!

ख्रिश्चन समुदायाचं सर्वोच्च स्थान असणाऱ्या व्हॅटिकन सिटीत आता चक्क जादूटोणा आणि ब्लॅकमॅजिक संदर्भातले वर्ग सुरू होणार आहे. असे वर्ग सुरू करण्यासाठी जगभरातल्या कॅथेलिक समुदायाकडून मोठी मागणी होती. त्यामुळं हा कोर्स सुरू होणार आहे.

Ajay Kautikwar
रोम,ता.17 एप्रिल: ख्रिश्चन समुदायाचं सर्वोच्च स्थान असणाऱ्या व्हॅटिकन सिटीत आता चक्क जादूटोणा आणि ब्लॅकमॅजिक संदर्भातले वर्ग सुरू होणार आहे. असे वर्ग सुरू करण्यासाठी जगभरातल्या कॅथेलिक समुदायाकडून मोठी मागणी होती. त्यामुळं व्हॅटिकने हा निर्णय घेतल्याचं वृत्त बीबीसीनं दिलं आहे.वर्षभर हा कोर्स चालणार असून प्रत्येक बॅचला आढवडाभराचं ट्रेनिंग देण्यात येणार आहे. असून 50 देशांमधले 250 पाद्री या वर्गात सहभागी होणार आहेत. 'एंटायटल्ड एक्सॉर्सिझम अँड द प्रेअर ऑफ लिबरेशन' असं या कोर्सचं नाव असून तो आठवडाभर चालणार आहे. 24 हजार एवढी त्याची फी आहे.भूत, प्रेत, अघोरी शक्तींची ओळख आणि अस्वस्थ, अशांत आत्म्यांना शांत करण्याच्या विधी या कोर्समध्ये शिकवण्यात येणार आहेत. जादूटोण्याचे धार्मिक विधी, त्याचा मनावर होणारा परिणाम आणि अघोरी विद्येचं शास्त्र त्यासाठीच्या प्रार्थना याबाबतही या कोर्समध्ये शिकवण्यात येणार आहे.

 

Trending Now