शाळेवर गोळीबाराच्या घटनेनं अमेरिका हादरली, 10 ठार

ही घटना ह्युस्टनपासून 50 किमी अंतरावर असलेल्या सँटा फी हायस्कूलमध्ये घडलीये.

Sachin Salve
18 मे : अमेरिकेतील टेक्सास राज्यात एका शाळेत गोळीबाराची घटना घडलीये. या घटनेत 10 जणांचा मृत्यू झालाय तर अनेक जण जखमी झाले आहे.ही घटना ह्युस्टनपासून 50 किमी अंतरावर असलेल्या सँटा फी हायस्कूलमध्ये घडलीये. या घटनेत एक अधिकारीही जखमी झालाय.  शाळेचे सहाय्यक मुख्याध्यापक क्रिस रिचर्डसन यांनी दिलेल्या माहितीनुसार, हल्लखोराला अटक करण्यात आलीये. या हल्लेखोराने केलेल्या गोळीबार शाळेतील 10 विद्यार्थ्यांचा मृत्यू झालाय.हल्लेखोराने 7.45 वाजता शाळेत अंदाधुंद गोळीबार केला. शाळा सुटण्याची वेळ झाली त्याचवेळी हा हल्ला झाला.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी टि्वट करून या घटनेबद्द दु:ख व्यक्त केलं.

Trending Now